Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयानं आणखी एक कुटुंब वाचवलं, पती-पत्नीला एकत्र राखलं!

तेलुगूतून समजवून आंध्रचं तर आता हिंदीतून बोलून बिहारचं जोडपं एक ठेवलं!

August 5, 2021
in कायदा-पोलीस
0
supreme court

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने व्हर्चुअल सुनावणीत एकामेकांपासून वेगळे राहणाऱ्या दाम्पत्यांना एकत्र आणले आहे. न्यायालयाने सुनिश्चित केले की, पती पत्नीला सन्मानाने घरी घेऊन जाईल. न्यायालयाने म्हटले की, यानंतर काही काळ पतीच्या वागण्यावर न्यायलयाचे लक्ष असेल आणि त्याला पत्नीवर दाखल केलेले सर्व खटले मागे घ्यावे लागतील.

 

सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने पाटणामधील एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली, जो आपल्या पत्नीसोबत कायदेशीर लढाई लढत होता. त्या व्यक्तीने पत्नीसह व्हर्चुअल उपस्थितीसाठी विनंती केली होती. न्यायालयाने प्रथम हिंदीत रांचीतील कांके येथे राहणाऱ्या पत्नीला विचारले की ती तिच्या पतीसह सासरी परतण्यास तयार आहे का? तेव्हा महिलेने सांगितले की, जर पतीने त्रास दिला नाही तर मी जाण्यास तयार आहे.

 

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पतीला विचारले, ‘तुम्हाला सर्व खटले मागे घ्यायचे आहेत का? तुमच्या वडिलांनीही एक खटला दाखल केला आहे. त्यावर पतीने हो असे उत्तर दिले. न्यायालयाने म्हटले, “जामीन मिळविण्यासाठी हे नाटक तर नाही, आम्ही तुम्हाला सोडणार नाही… आम्ही ही याचिका प्रलंबित ठेवत आहोत.” सर्व खटले मागे घ्या. अ‍ॅफिडेविट द्या आम्ही सोडणार नाही. अन्यथा तुम्हाला पुन्हा तुरुंगात जावे लागेल.अ‍ॅफिडेविटसाठी न्यायालयाने पतीला दोन आठवड्यांचा वेळ दिला असून पत्नीला सन्मानाने घरी परत घेऊन जाण्यास सांगितले आहे.

 

याआधी, २८ जुलै रोजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आंध्र प्रदेशात वेगळे राहणाऱ्या दांपत्याची व्हर्चुअल सुनावणी घेतली. २१ वर्षापासून कायदेशीर लढाई लढणाऱ्या दाम्पत्याला पुन्हा एकत्र आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त प्रयत्न केले होते आणि पत्नीला हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीची शिक्षा वाढवण्यासाठी केलेली याचिका मागे घेण्यासाठी तयार केले होते.


Tags: biharSupreme Courtबिहारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

“पवारसाहेब, साखर कारखानदारांसाठी मोदींना भेटता, मराठा आरक्षणासाठीही भेटा!”

Next Post

ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल भारतीय हॉकी संघाच अजित पवारांकडून अभिनंदन

Next Post
Ajit pawar

ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल भारतीय हॉकी संघाच अजित पवारांकडून अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!