मुक्तपीठ टीम
९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जयपूरच्या पॉक्सो न्यायालयाने मंगळवारी एका दोषीला २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने संपूर्ण सुनावणी पाच दिवसांत केली. तर या प्रकरणात पोलिसांनी १८ तासाच्या आत आरोपीला अटक केली होती.
दक्षिण जयपूरचे उपायुक्त हरेंद्र कुमार म्हणाले की, २ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बालमुकुंदपुरा येथील रहिवासी कमलेश मीना याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्वरित कारवाई करत १८ तासांच्या आत कमलेशला अटक केली.
या प्रकरणी कोतखवाडा पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी आणि पॉक्सोच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. उपायुक्तांनी सांगितले की, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन १५० पोलिसांची १० पथके तयार करण्यात आली होती.
यानंतर कमलेशला जयपूरच्या पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला अवघ्या पाच दिवसात दोषी ठरवले आणि २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. राजस्थानच्या न्यायिक इतिहासातील बहुधा हे पहिलेच प्रकरण आहे, जिथे फक्त पाच दिवसात शिक्षा सुनावण्यात आली.
This should happen in every case, then only cases can be controlled.