Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांना भेटल्यानंतर भाऊ बोलले…”ते एकदम ओके! खोट्या केसमध्ये गुंतवलं! घरात सापडलेले १० लाख एकनाथ शिंदेंनी पक्षासाठी दिलेले!!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Patra Chawl Scam

मुक्तपीठ टीम

मुंबईतील १ हजार २०० कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने अटक केली आहे. या कारवाईच्या काळात संजय राऊत यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. दरम्यान, सगळ्या बोगस केस कागदावर आणून खोट्या केसमध्ये संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोप संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. “मी संजय राऊत यांना भेटलो, ते ओके आहेत, बिनधास्त आहेत. त्यांना काही टेन्शन किंवा भीती नाही.” अशी माहितीही त्यांनी दिली.

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाखांची रोख रक्कम ही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेना पक्षाला दिलेली असलेयाचा दावाही सुनील राऊत यांनी केला आहे.

सुनील राऊत यांचा बनावट केसेसचा आरोप!

  • सगळ्या बोगस केस कागदावर आणल्या आहेत.
  • पूर्वी ज्या केसच्या चौकशीसाठी संजय राऊत यांना बोलावलेलं होतं, त्याच्या खोट्या केस बनवून अटक दाखवण्यात आली आहे.
  • सकाळी साडेनऊ-दहा वाजताच्या सुमारास त्यांना जेजेमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेतील, तर साडेअकरा बाराला कोर्टात हजर करतील.
  • पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नाही, एक टक्काही नाही, संजय राऊत यांना कागदपत्र वाचून दाखवण्यात आली, की कशात अटक करण्यात आली आहे, त्यात याचा उल्लेख नसावा.
  • ५० लाखाच्या एन्ट्री आणि काहीतरी बोगस केस फाईल बनवून अटक केली आहे.

संजय राऊत ईडी कोठडीतही एकदम ओके!

  • मी संजय राऊत यांना भेटलो, ते ओके आहेत, बिनधास्त आहेत.
  • त्यांना काही टेन्शन किंवा भीती नाही.
  • दहा लाखांची जी कॅश सापडली, त्याच्यावर ज्यांनी ताबा घेतला, त्यावेळी लिहिलं होतं अयोध्या आणि एकनाथ शिंदे.
  • ते अयोध्याला गेले होते, त्याचं काँट्रिब्युशन होतं, ते पक्षाचे पैसे आहेत आणि पक्ष कार्यालयात जमा होणार होते.
  • आम्ही न्यायालयीन लढाई लढणार.
  • तुम्ही रामायण-महाभारत बघा, सत्याचाच विजय होतो.
  • संजय राऊत यांना काही दिवसात न्याय मिळेल, भाजपा राऊतांना घाबरली म्हणून अटक केली.

Tags: Eknath ShindePatra Chawl Scamsanjay rautShivsenaSunil Rautएकनाथ शिंदेपत्राचाळ घोटाळाशिवसेनासंजय राऊतसुनील राऊत
Previous Post

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १२२ जागांवर करिअर संधी

Next Post

#तुळशीदासभोईटे #सरळस्पष्ट संजय राऊतांमागे ईडी पिडा का? अर्जुन खोतकरांमुळे उघड झालं कारण!

Next Post
#तुळशीदासभोईटे #सरळस्पष्ट  संजय राऊतांमागे ईडी पिडा का? अर्जुन खोतकरांमुळे उघड झालं कारण!

#तुळशीदासभोईटे #सरळस्पष्ट संजय राऊतांमागे ईडी पिडा का? अर्जुन खोतकरांमुळे उघड झालं कारण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!