Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरवर ग्रुप बनला, चर्चा झाली आणि जन्माला आले महिलांचा छळ करणारे सुल्ली आणि बुल्लीबाई अॅप!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
shweta singh

मुक्तपीठ टीम

सुल्ली डिल्स आणि बुल्लीबाई अॅप प्रकरणात आणखी एक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. सुल्ली डिल्सचे निर्माते ओंकारेश्वर ठाकूर आणि बुल्ली बाई अॅपचे निर्माते नीरज बिश्नोई यांनी पोलिस चौकशीत सांगितले की, अॅप बनवण्यापूर्वी २१ जानेवारी रोजी ट्विटर हँडलवर ट्रेड महासभा ग्रुप तयार करण्यात आला होता. हा ग्रुप तिसऱ्या व्यक्तीने तयार केला होता. या ग्रुपमधील संभाषणानंतर वादग्रस्त अॅप बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जून-जुलै २०२१ मध्ये सुल्ली डील्स बनवण्यात आला.

 

दुसरीकडे, नीरज बिश्नोईच्या लॅपटॉपचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. ट्रेड महासभा ग्रुपची स्थापना करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. ट्रेड महासभा ग्रुपमधील सर्व आरोपी एकमेकांना ओळखत नसून सर्वांनी आपली आडनावे बदलली होती.

 

इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑप्स (IFSO), स्पेशल सेलच्या युनिटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नीरजच्या लॅपटॉपच्या अहवालावरून असे दिसून आले आहे की त्याने ट्रेसिंग टाळण्यासाठी टॉर ब्राउझरचा वापर केला. त्याच्या मोबाईलवरून १५३ लिंक सापडल्या आहेत. पोलिसांनी या लिंक्स उघडून पाहिल्या. यातील बहुतांश लिंक पॉर्न चित्रपटांच्या आहेत. याशिवाय काही लिंक्सवर हिंदू धर्माचा संपूर्ण इतिहास आहे.

 

या लिंक्समध्ये मुघल आणि इंग्रजांनी हिंदू धर्म संपवला असे म्हटले आहे. हिंदू धर्म वाचवण्यासाठी काहीही केले जात नाही. एका लिंकमध्ये हिंदू धर्म म्हणजे काय आणि मनुस्मृती कशी लिहिली गेली आणि त्यात काय आहे यासंबंधित माहिती आहे. एसीपी रमेश लांबा यांच्या देखरेखीखाली इन्स्पेक्टर हंसराज, भानुप्रताप, अरुण आणि एसआय नीरज आणि पवन यांची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे.

 

दोन्ही आरोपी गुरुवारपर्यंत दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई, नोएडा आणि किशनगड पोलीस ठाणे, दिल्ली पोलिसांनी आरोपींना रिमांडवर घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

 

नोएडा पोलिसांकडून दोघांची चौकशी

  • सेक्टर-२४ नोएडा पोलिस स्टेशनचे अधिकारी बुधवारी द्वारका येथील IFSC कार्यालयात पोहोचले आणि दोन्ही आरोपींची चौकशी केली.
  • पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींची जवळपास तीन तास चौकशी केली.
  • नोएडा पोलिसांनी आरोपीला रिमांडवर घेण्यासाठी अर्ज केला आहे.
  • वादग्रस्त अॅपबाबत नोएडाच्या सेक्टर-२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • याशिवाय मुंबई पोलिसांनी बुधवारी दिल्ली पोलिसांशीही संपर्क साधला.

Tags: BulliBai apptwitterट्विटरबुल्लीबाईसुल्ली डिल्स
Previous Post

“संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग महत्वपूर्ण, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम करण्याची वृत्ती रुजावी”

Next Post

“पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न असल्याचे स्पष्ट”

Next Post
Chandrakant Patil Statement on PM security Breach

"पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न असल्याचे स्पष्ट"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!