मुक्तपीठ टीम
देशाची राजधानी दिल्लीत, प्रगती मैदानावर ४१वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा म्हणजेच भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा सुरू आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या व्यापार मेळाव्यात एकापेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या मेळाव्यात अरब अमीरात आणि ब्रिटनसह अनेक देशांतील प्रदर्शकांचा समावेश आहे. तसेच सुमारे २ हजार ५०० देशी-विदेशी उत्पादने प्रदर्शनात आहेत. या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनी लोकांना आकर्षित करत आहे. लोकं या प्रकारची कंपनी पाहून चकित होत आहेत
अंत्यसंस्कार करणारी कंपनी आहे तरी कशी?
- दिल्ली ट्रेड फेअरमध्ये सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनीसमोरील तिरडी लोकांना त्याकडे आकर्षित करत आहे.
- ही कंपनी अंत्यसंस्कार सेवा प्रदान करते.
- मृत्यूनंतर व्यक्तीच्या अंतिम संस्काराची जबाबदारी त्याच्या कुटुंबावर असते. अंतिम संस्कार करण्याचा अधिकार फक्त कुटुंबाला आहे. पण नव्या युगात सर्व काही बदलले आहे.
- आता पैसे देऊनही अंतिम संस्कार करता येणार आहेत.
- अंत्यसंस्कार करणारी कंपनीही बाजारात आली आहे.
- लोक काही रक्कम खर्च करून अंत्यसंस्काराची व्यवस्थाही करू शकतात.
सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनी कोणत्या सेवा पुरवते?
- सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनी तिरडीला खांदा देण्यापासून ते एकत्र चालणारे, ‘राम नाम सत्य है’ म्हणणारे आणि पंडित-न्हावी या सगळ्यांची सोय करते.
- एवढेच नाही तर मृतदेहाच्या अस्थिंचे विसर्जनही कंपनीद्वारे करण्यात येणार आहे.
- अंतिम संस्काराशी संबंधित सर्व विधी कंपनीच करणार आहे.
- अंतिम संस्कारासाठीच्या सर्व व्यवस्थेचे शुल्क कंपनीने ३७ हजार ५०० रुपये ठेवले आहे.
कंपनीच्या या बिझनेस आयडियाला लोकांची सोशल मीडियावर पसंती
- सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
- युजर्स ही वेगळी कल्पना नवीन आणि अनोखे स्टार्टअप म्हणून सांगत आहे.
- यावर लोक जबरदस्त प्रतिक्रिया आणि पसंती दर्शवत आहेत.