मुक्तपीठ टीम
दिवाळीच्या सणात प्रत्येक घराघरात सुख-समृद्धी येण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वच लहान मुलं ही देवा घरची फुलं असं म्हटलं जातं. पण मुलींना वेगळंच महत्व. पहिली बेटी ही धनाची बेटी असं संबोधून मुलींना घरची लक्ष्मी मानलं जातं. तर या वर्षी दिवाळीत घरच्या या लक्ष्मीचं भविष्य सुरक्षित करून मान राखा. भाऊबीजेनिमित्त मुलीला किंवा बहिणीला तिच्या चांगल्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडून द्या.
भारतीय पोस्टात नऊ लहान बचत योजना आहेत. या लहान बचत योजनांपैकी एक सुकन्या समृद्धी योजना आहे. ही योजना खास ‘मुलींसाठी’ तयार करण्यात आली आहे. मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सरकारने २०१४ मध्ये ही योजना सुरू केली होती.
सुकन्या समृद्धी योजना आहे तरी कशी?
- या योजनेत १० वर्षांखालील मुलीच्या नावाने तिच्या पालकाच्या वतीने खाते उघडले जाऊ शकते.
- मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडण्याची सुविधा आहे.
- या योजनेत ७.६ टक्के वार्षिक व्याजाचा लाभ मिळतो.
- प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात व्याज जमा केले जाते.
- या योजनेत मिळणारे व्याज आयकर कायद्यांतर्गत करमुक्त आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी २५० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
- या योजनेत गुंतवणुकीची रक्कम रु१.५ लाख आहे.
- मुलीच्या लहान वयातच या योजनेत गुंतवणूक केली असेल तर १५ वर्षांसाठी त्याअंतर्गत गुंतवणूक करू शकता.