मुक्तपीठ टीम
राज्य सरकारने २७ जानेवारी रोजी मोठा निर्णय घेतला. राज्यातील किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. दरम्यान या निर्णयानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरावरून जोरदार विरोध केला जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला बेमुदत संपाचा इशाराच दिल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
किराणा दुकानात वाईन विक्री होऊ देणार नाही- सुजय विखे पाटील
- खासदार सुजय विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
- मुख्यमंत्री सांगोत किंवा राज्य सरकार शिर्डी मतदारसंघात किराणा दुकानात वाईन विक्री होऊ देणार नाही.
- जे किराणा दुकानदार वाईन विक्री करतील ती दुकाने मी स्वत: बंद करणार.
- ज्या विषयात समाजहित नाही त्याला मी विरोध करत राहणार.
- अनेक शाळा आणि महाविद्यालयातील तरुण-तरुणींचे प्रश्न मी सोडवले आहेत.
- जे मंत्री आहेत, सत्ताधारी आहेत त्यांच्या घरातील महिलांसोबत वाईट वेळ येऊ देणार नाही.
- परमेश्वर करतो तशी वाईट वेळ येऊ नये.
- मात्र, ती वेळ शिर्डी मतदारसंघात येण्याची वाट आपण पाहणार नाही.
इम्तियाज जलील यांचा मविआ सरकारला इशारा
- तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादमधल्या दुकानात वाईन ठेवून दाखवा.
- एका चांगल्या कामासाठी आम्हाला कायदे मोडावे लागले तर आम्ही पुढे मागे पाहणार नाही.
- शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईनचं धोरण आणलं, असं महाविकास आघाडी म्हणत असेल तर काही दिवसांनी दुकानात चरस आणि गांजाही ठेवाल.
- तेसुद्धा शेतातच पिकतं की?
- एवढंच असेल तर दुधाचे उत्पादन आणि विक्रीच्या वाढीसाठी सरकार प्रोत्साहन का देत नाही.