Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजिंठाजवळील फर्दापूर येथे उभारल्या जाणाऱ्या ‘भीमपार्क’साठी चांगल्या सूचना

February 19, 2021
in सरकारी बातम्या
0
Fardapur Bhim park meeting

मुक्तपीठ टीम

          मुंबई, दि. 18 : जागतिक पातळीवरील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे, अभ्यासकांसाठी महत्वाचे आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणारे ‘भीमपार्क’ उभारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इतिहास, पालीभाषा , बौद्ध धम्म आणि पर्यटन या विषयाचे अभ्यासक या सर्वांच्या सूचनांचे स्वागत करुन हा प्रकल्प उभारण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

            महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून अजिंठा जवळील फर्दापूर येथे दहा एकर जागेवर भीमपार्क उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन हा प्रकल्प उभा राहणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यातील मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले होते.

             सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावळे, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, औरंगाबाद येथिल भन्ते करुनानंद थेरो, नांदेडचे भन्ते विनय बोधी, पुर्णाचे भन्ते उपगुप्त, नासिकचे पाली भाषा अभ्यासक,  अतुल भोसेकर, धम्म अभ्यासक  डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. ऋषीकेश कांबळे, पुण्याचे डॉ. बबन जोगदंड, मुंबई विद्यापिठाचे डॉ. लक्ष्मण सोनवणे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती वंदना घेवराईकर, नाशिकचे नरेंद्र तेजाळे, लातुरचे यशवंत भंडारे व इतर संबधीत वरिष्ठ  अधिकारी उपस्थित होते.

            महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी तयार होत असलेल्या स्मारकासाठी अभ्यासपूर्ण लेखी सूचना मागविण्यात येतील. या प्रकारच्या इतर स्मारकांना भेटी देण्यासाठी अभ्यासगटाची नेमणूक करण्यात येईल.

            पर्यटन विभागाच्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून यात डॉ.बाबासाहेब यांचे जीवन ,त्यांचे कार्य आणि त्यांनी केलेली चळवळ, त्यावेळेचे मंत्री, भारतीय राज्यघटनेमधील सहभाग या सर्व बाबींचा समावेश असेल.

            दहा एकर परिसरात तयार होणाऱ्या या प्रकल्पास पूर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी आणि सुमारे 25 कोटी रुपये लागतील. हा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. सत्तार यांनी यावेळी  सांगितले.

मान्यवरांच्या सूचना

            या प्रकारचा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे सर्व मान्यवरांनी आभार मानले. या प्रकल्पाच्या उभारणीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

मान्यवरांनी महत्वपुर्ण सूचनाही केल्या.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक भूमिकेसह धार्मिक, आर्थिक आणि राजकीय निती याचा समावेश असावा
  • राज्यातील सर्व लेण्यांची माहिती देणारे दालन असावे
  • डॉ.आंबेडकर संरक्षण,आंतरराष्ट्रीय धोरण, कामगार, महिला यासारख्या क्षेत्रातील कामांची माहिती इथे मिळावी
  • विदेशी पर्यटकांना संशोधनासाठी अभ्यासाची,राहण्याची सोय असावी.
  • महात्मा फुले,राजर्षी शाहु महाराज यांच्यासह सयाजी महाराज गायकवाड यांच्या कामाचीही माहिती मिळावी
  • डॉ. आंबेडकर लिहिलेले मराठीसह भिन्न भाषेतील साहित्य उपलब्ध असावे.
  • माता रमाई यांच्या विषयीचे दालन असावे
  • सम्राट अशोकाने केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाची माहिती असावी
  • या ठिकाणी महोत्सव आयोजित करावेत
  • भगवान गौतम बुद्ध यांची पूर्णाकृती मुर्ती असावी
  • पंचशिलाची माहिती द्यावी
  • सातत्याने अभ्यासपूर्ण भर टाकण्यासाठी अभ्यासक नेमावेत

            या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून पुन्हा बैठक घेण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.


Tags: abdul sattarbhim parkअब्दुल सत्तारभीमपार्क
Previous Post

अधिवेशनाच्यावेळी विधानभवनात येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी सक्तीची

Next Post

‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
Hon Dy CM Ajit Pawar Sir inauguration of Hinduism Beyond Ritualism 3

‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!