मुक्तपीठ टीम
भारताच्या साखर निर्यातीत २९१% ची घसघशीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये १,१७७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीच्या साखरेची निर्यात झाली होती तर आता आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल ४६०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीची साखर निर्यात करण्यात आली आहे. डीजीसीआय अँड एस अर्थात वाणिज्य गुप्तचर आणि सांख्यिकी महासंचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताने जगभरातील १२१ देशांना साखर निर्यात केली आहे.
वर्ष २०२१-२२ मध्ये देशाची साखर निर्यात त्याआधीच्या वर्षीपेक्षा ६५% नी वधारली. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या, मालवाहतुकीचे वाढीव दर, कंटेनर्सची टंचाई यासारख्या वाहतूकविषयक आव्हानांवर मात करून ही वाढ करण्यात यश मिळाले आहे.
ट्विट संदेशामध्ये या ऐतिहासिक कामगिरीवर अधिक भर देत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, मोदी सरकारची धोरणे देशातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारात प्रवेश करून उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करत आहेत.
डीजीसीआय अँड एस कडे उपलब्ध माहितीनुसार, भारताने २०१९-२० मध्ये १९६५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीची साखर निर्यात केली होती त्यात वाढ होऊन २०२०-२१ मध्ये ती २७९० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स झाली तर २०२१-२२ मध्ये यात आणखी वाढ होऊन या वर्षी ४६०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीची साखर निर्यात करण्यात आली.
आता, वर्ष २०२१-२२ मध्ये (एप्रिल ते फेब्रुवारी या काळात) भारताने, ७६९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या साखरेची इंडोनेशिया देशाला निर्यात केली आहे, तर बांगलादेश(५६१ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), सुदान(५३० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) आणि संयुक्त अरब अमिरात (२७० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)इतक्या मूल्याची साखर निर्यात केली आहे. भारताने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका,जर्मनी,फ्रान्स,न्यूझीलंड, सोमालिया, सौदी अरब, मलेशिया, श्रीलंका, रशिया आणि इजिप्त इत्यादी देशांना देखील साखर निर्यात केली आहे.
Unit: USD Million
Products | 2019-20 | 2020-21
|
2021-22 |
Sugar | 1965 | 2791 | 4600 |
विक्रमी निर्यातीनंतर देखील, २०२१-२२ च्या साखर हंगामाच्या (ऑक्टोबर ते सप्टेंबर) अखेरीला देशाकडे ७३ लाख टन इतक्या दिलासादायक पातळीचा साठा शिल्लक असेल. साखर निर्यातीचा वाढीचा कल कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व सरकार करणार आहे.
पाहा व्हिडीओ: