मुक्तपीठ टीम
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाली. ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदावर विराजमान होताच अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, तर काहींना मंत्रिमंडळात स्थानही दिलं आहे. त्यापैकीच त्यांच्या मंत्रिमंडळात सुएला ब्रेव्हरमन, ज्या लिझ सरकारमध्ये गृहमंत्री होत्या, त्या परतल्या आहेत. त्यांची पुन्हा गृहमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतासोबत मुक्त व्यापार करार झाल्यास ब्रिटनमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढेल, असे सुएला ब्रेव्हरमन यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
ब्रेव्हरमन यांनी भारताबद्दल काय वादग्रस्त वक्तव्य केलं?
- ब्रेव्हरमन यांनी स्पेक्टॅटर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारताबरोबर व्यापारी करार केल्याने ब्रिटनमध्ये होणारं स्थलांतरण वाढेल.
- आधीच ब्रिटनमध्ये भारतातून आलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे.
- भारताबरोबर मुक्त स्थलांतरण धोरण ठरवण्याविषयी मला काळजी वाटते.
- कारण ब्रेक्झिट होताना लोकांनी त्यासाठी मतदान केलेलं नाही.
- विद्यार्थी आणि उद्योजकांना सवलत देण्याविषयी माझं वेगळं मत आहे.
- ब्रिटनमधील स्थलांतरितांची संख्याही लक्षात घेतली पाहिजे.
- ब्रिटनमध्ये मुदतीपेक्षा अधिक राहणाऱ्यांमध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे.
- अधिक चांगल्या सहकार्यासाटी मागील वर्षी याबाबत भारत सरकारबरोबर एक करारही करण्यात आला.
- मात्र, त्याचा आवश्यक परिणाम होताना दिसत नाही.
सुएला यांना का द्यावा लागला राजीनामा?
- सुएला ब्रेव्हरमनवर सरकारी कागदपत्रे एका खासदाराला ईमेलद्वारे पाठवल्याचा आरोप होता.
- त्यांच्यावर गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप होता.
- यानंतर ब्रेव्हरमन यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला.
- मात्र, त्यानंतरही ट्रस सरकार चालू शकले नाही. लिझ ट्रस यांनी आपले अपयश स्वीकारले आणि राजीनामा सादर केला.
कोण आहेत सुएला ब्रेव्हरमन?
- सुएला या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहे.
- त्यांचे वडील क्रिस्टी फर्नांडिस मूळचे गोव्याचे असले तरी आई उमा तमिळ हिंदू कुटुंबातील होत्या.
- मात्र १९६० मध्ये त्या ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या.
- सुएलाचा जन्म लंडनमध्येच झाला होता.
- त्या ब्रिटिश नागरिक आहे.
- लिझ सरकारमध्ये ४३ दिवस गृहमंत्री राहिलेल्या सुएला यांनी २० ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला.