Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोठारी येथील राष्‍ट्रीय महामार्ग सुविधाजनक, आकर्षक व सुंदर व्‍हावा”: सुधीर मुनगंटीवार

June 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
sudhir mungantiwar

मुक्तपीठ टीम

बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी या गावातुन जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गाचे चौपदरी बांधकाम करणे, दुभाजक बसविणे, आकर्षक पथदिव्‍यांची व्‍यवस्‍था करणे, सांडपाण्‍याचा निचरा होण्‍याच्‍या दृष्‍टीने पक्‍क्‍या नालीचे बांधकाम करणे या सर्व बाबींसह कोठारी गावातून जाणारा राष्‍ट्रीय महामार्गाचा भाग आकर्षक व रूंद होण्‍याच्‍या दृष्‍टीने राष्‍ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व आपण स्‍वतः लोकप्रतिनिधी तसेच गावकऱ्यांसह लवकरच पाहणी व चर्चा करून योग्‍य उपाययोजना करू, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सुधीर मुनगंटीवार यांनी कोठारी गावातून जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गाबाबत नागरिकांच्‍या मागणीनुसार राष्‍ट्रीय महामार्ग विभागाच्‍या अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतली. राष्‍ट्रीय महामार्ग विभागाचे विभागीय अभियंता जैस्‍वाल, विनोद मिश्रा,भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद सदस्‍या वैशाली बुध्‍दलवार, सोमेश्‍वर पदमगिरीवार, सरपंच मोरेश्‍वर लोहे, विनोद बुटले, संतोष लोनगाडगे, राजू बुध्‍दलवार, रमेश पिपरे, शुभम बुरेवार आदींची प्रामुख्‍यान उपस्थित होती.
या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांच्‍या मागणीनुसार सदर राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या बांधकामाचा आढावा घेतला. येनबोडी या गावाजवळ जुने सौंदर्यीकरण काढल्‍यामुळे जो खड्डा तयार झाला आहे तो त्‍वरीत बुजविण्‍यात यावा व पळसगांव ग्राम पंचायतीच्‍या गेटचे नव्‍याने बांधकाम करण्‍यात यावे, अशा सुचना मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

 

नागरिकांच्‍या मागणीनुसार बांधकामात काही बदल करावयाचे असल्‍यास स्‍वतंत्र अंदाजपत्रक तयार करावे यासाठी निधी उपलब्‍ध होण्‍याबाबत आपण स्‍वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍याशी चर्चा करू, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. या परिसरातील वळण रस्‍त्‍यावर होणारे अपघात लक्षात घेता उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली. त्‍याचप्रमाणे बस स्‍थानकानजीक शौचालय तथा मुत्रीघर आमदार निधीच्‍या माध्‍यमातुन बांधण्‍यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. गोंडपिपरीच्‍या धर्तीवर कोठारी येथील रस्‍ता आकर्षक व्‍हावा यादृष्‍टीने लवकरच सुधीर मुनगंटीवार, अधिकारी व गावकऱ्यांसह पाहणी दौरा करणार आहेत. बैठकीचे प्रस्ताविक व समारोप देवराव भोंगळे यांनी केला.

 


Tags: BJPKothariNational HighwayNational highway departmentNitin Gadkarisudhir mungantiwarनितीन गडकरीसुधीर मुनगंटीवार
Previous Post

जळगावच्या कृषी विज्ञान केंद्रात आठ जागांवर रोजगार संधी

Next Post

“काँग्रेस नेत्यांना सर्वत्र घोटाळेच दिसतात”

Next Post
keshav upadhye

"काँग्रेस नेत्यांना सर्वत्र घोटाळेच दिसतात"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!