मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. गीते यांच्या या विधानावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी संधी साधत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे, ही युती नकोच, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे पीएचडीचा विषय
- संजय राऊतांचा अपवाद सोडला तर शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा, त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे.
- संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल.
- राऊत हे उद्धव ठाकरेंचं जेवढं कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचं कौतुक करत असतात, असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती
- अनंत गीते हे हृदयपासून बोलत होते.
- जे बोलत होते ते ऐतिहासिक सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर अशी दुर्देवी, अनैसर्गिक आघाडी झाली हे बघून बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती.
- अशा शिवसेनेसाठी मी आयुष्याचा कण आणि कण वेचला नाही असं त्यांनी सांगितलं असतं. माझी शिवसेना देव, देश आणि धर्मासाठी काम करत आली आहे, असंही ते म्हणाले असते, असं सांगतानाच परभणीचे खासदार बंडू जाधव यांचंही काही दिवसांपूर्वी त्यांचं भाष्य ऐकलं.
- ही आघाडी अकबर-बिरबलाच्या कहाणी सारखी आहे.
- वेळ आली तर आम्ही राष्ट्रवादीला पायाखाली तुडवू असं ते म्हणाले होते.