Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अफगाणिस्तानमध्ये आयपीएलवर बंदी…चीअरलीडर्सचा नाच तालिबानला नामंजूर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
IPL

मुक्तपीठ टीम

आयपीएलमधील चीअरलीडर्स म्हणजे अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र. खेळाडूंमध्ये त्या किती जोष भरतात माहिती नाही, पण तिथे त्या उत्सवी वातावरणनिर्मितीत नक्कीच उपयोगी ठरतात. मात्र, आता त्या तालिबान्यांच्या डोळ्यात खुपल्या आणि त्यामुळे आयपीएलही त्यांच्या डोक्यात गेले आहे. त्यांनी अफगानिस्तानमध्ये आयपीएलवर बंदी घातली आहे.

 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १४ व्या सीझनचा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू झाला आहे. आयपीएल भारतासह जगभरात लोकप्रिय आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटपटू आयपीएल मध्ये आपली प्रतिभा दाखवत असतात. दरवर्षी प्रमाणे त्याचे थेट प्रक्षेपण जवळजवळ प्रत्येक देशात चालू आहे. पण याच दरम्यान अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा नवीन हुकूम जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तान मध्ये आयपीएल बॅन करण्यात आले आहे. तालिबान्यांनी हे जाहीर केले आहे. आयपीएल इस्लामविरोधी आहे, चीअरलीडर्स सामना सुरु असताना डान्स करतात, तसेच महिला केस न झाकता सामना पाहायला येतात या गोष्टींवर आक्षेप घेऊन तालिबान्यांनी अफगाणिस्थानात आयपीएल बॅन केले आहे.

 

अफगाणिस्तानमध्ये मनोरंजनाच्या मर्यादा

  • अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानचे राज्य आहे, त्यामुळे त्यांच्या सर्व आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
  • मनोरंजनाच्या बहुतेक साधनांना अफगाणिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
  • आयपीएलही त्याला अपवाद नाही.
  • एकीकडे तालीबान क्रिकेटचे एम्बॅसीटर असल्याचा दावा करते.
  • तर दुसरीकडे आयपीएल बॅन.
  • आयपीएल सामन्यांदरम्यान चीअर लीडर्स नाचतात, महिला केस न झाकता सामने बघायला येतात, हे सर्व इस्लामच्या विरोधात आहे.
  • असे मत तालिबान्यांनी व्यक्त केले आहे.
  • याच कारणांमुळे अफगाणिस्थान मध्ये आयपीएल बॅन करण्यात आले आहे.

 

अफगाणिस्तानमध्ये महिलांची स्थिती भयावह

  • अफगाणिस्तानमधील महिला यापुढे कोणत्याही प्रकारचे खेळ खेळू शकणार नाहीत.
  • पुरुषांवर कोणतेही निर्बंध नाहीत.
  • अफगाणिस्तानचे नवे क्रीडा महासंचालक बशीर अहमद रुस्तमझाई यांना जेव्हा विचारण्यात आले की भविष्यात महिला कधीच कोणत्याही खेळात सहभागी होऊ शकतील का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले नाही.
  • अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे भवितव्यही बंदुकीच्या बळावर झालेल्या सत्ता बदलामुळे धोक्यात आले आहे.

Tags: AfghanistanIPLtalibanअफगाणिस्तानआयपीएलइंडियन प्रीमियर लीगक्रीडा महासंचालक बशीर अहमद रुस्तमझाईचीअरलीडर्सतालिबान
Previous Post

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना ही राजकीय आत्महत्याच! – मुनगंटीवार

Next Post

“….मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं?”

Next Post
keshav upadhye

"....मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!