मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आघाडी सरकारवर भाजपा टीका करत असते. यातच आता भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. सात आश्यर्य असलेल्या या जगातील आठवं आश्चर्य म्हणजे माननीय मुख्यमंत्री! असं म्हणत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्याचवेळी मुंबई मनपाच्या आगामी निवडणुकीनंतर महापौरपदी भाजपाचाच महापौर बसणार, असा दावाही त्यांनी केला.
आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशन भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. तसेच मुंबईमध्ये आगामी निवडणुकीनंतर भाजपाचाच महापौर बसणार, असा दावाही सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
जगातील आठवे आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री!
- इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं
- “आमदार म्हणू दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे.
- जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे.
- मात्र, गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
- याची देखील नोंद केली पाहिजे.
- सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं.
स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष
- स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा हा प्रकार सध्या सुरु आहे.
- मला व्यक्तिगतरीत्या वाटतं की थांबले पाहिजे आता. राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे.
- स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवले जात आहे.
- हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे.
- विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावं यासाठी मध्यान्न भोजन दिलं जातं, उद्या तर हे नेते म्हणतील त्यांच्यामध्ये उत्साह येण्यासाठी त्यांना हर्बल वनस्पती सध्या शाळेतच द्या.