Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हेलिकॉप्टरद्वारे स्वदेशी बनावटीच्या स्टँड-ऑफ अँटी टँक (SANT) रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
SANT Missile

मुक्तपीठ टीम

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय हवाई दल (IAF) यांनी नुकतीच केलेली चाचणी भारताचा अभिमान वाढवणारी आहे. स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या स्टँड-ऑफ अँटी टँक (SANT) या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची हेलिकॉप्टरद्वारे चाचणी करण्यात आली. सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यात ही उड्डाण-चाचणी यशस्वी ठरली. रिलीज यंत्रणा , प्रगत मार्गदर्शन आणि ट्रॅकिंग अल्गोरिदम, एकात्मिक सॉफ्टवेअरसह सर्व यंत्रणांनी समाधानकारक कामगिरी केली. ट्रॅकिंग प्रणालीने संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण केले. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक एमएमडब्ल्यू (मिलिमीटर वेव्ह) सीकरने सुसज्ज असून सुरक्षित अंतरावरून उच्च दर्जाची अचूक मारक क्षमता प्रदान करते. हे क्षेपणास्त्र 10 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यातील लक्ष्ये निष्प्रभ करू शकते.

 

स्टॅन्ड ऑफ अँटी-टॅंक (SANT) हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र रिसर्च सेंटर इमारत (RCI), हैदराबाद यांनी इतर डीआरडीओ प्रयोगशाळांच्या समन्वयाने आणि उद्योगांच्या सहभागाने विकसित केले आहे. भारतीय हवाई दलाचा ताफा बळकट करण्यासाठी लांब पल्ल्याचा बॉम्ब आणि स्मार्ट अँटी एअरफील्ड क्षेपणास्त्र अलीकडच्या काळात चाचणी करण्यात आलेल्या स्वदेशी स्टँड-ऑफ शस्त्रास्त्रांच्या मालिकेतील हे तिसरे क्षेपणास्त्र आहे. प्रगत तंत्रज्ञानासह विविध वापरासाठी विविध वैशिष्टयांनी युक्त स्वदेशी विकास म्हणजे संरक्षणातील ‘आत्मनिर्भरते’ कडे एक ठोस मार्गक्रमण आहे.

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मोहिमेशी संबंधित टीमचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी म्हणाले की, स्टॅन्ड ऑफ अँटी-टॅंक-SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी स्वदेशी संरक्षण क्षमतांना अधिक बळ देईल.

पाहा व्हिडीओ: 


Tags: Defense Minister Rajnath SinghDRDOgood newsHyderabadIndiaMissile testmuktpeethRCISANTSANT Missilestand-off anti-tankक्षेपणास्त्र चाचणीडीआरडीओभारतमुक्तपीठसंरक्षण मंत्री राजनाथ सिंहस्वदेशी स्टँड-ऑफ अँटी टँकहैदराबाद
Previous Post

“या महाराष्ट्र आपलाच आहे…” पर्यटन अनुभव संस्मरणीय करण्यासाठी एमटीडीसी सज्ज!

Next Post

प्रत्येक किलोमीटरवर ई-स्कूटर्स बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स, बाऊन्सची नोब्रोकरसह अनेकांशी भागीदारी

Next Post
Battery Swapping Center

प्रत्येक किलोमीटरवर ई-स्कूटर्स बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स, बाऊन्सची नोब्रोकरसह अनेकांशी भागीदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!