मुक्तपीठ टीम
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने नव्या वर्षाच्या पहिल्या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आहे. सोमवारी सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी पीएसएलवी-सी52ने पृथ्वी अवलोकनासाठी असलेल्या ईओएस-04 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. अवघ्या १८ मिनिटात ६ वाजून १७ मिनिटांनी तो उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत पोहचला. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपणानंतर टीम इस्त्रोने टाळ्यांचा कडकडाट करत आनंद साजरा केला. या उपग्रहासह आणखी दोन लहान उपग्रहदेखील अवकाशात पाठवण्यात आले आहेत.
या मोहिमेअंतर्गत रडार इमेजिंग ईओएस-04 उपग्रहाला अवकाशात पाठवण्यात आले आहे. १,७१० किलो वजनाच्या या उपग्रहाला ५२९ किमीच्या सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षेत पोहचवण्यात आले आहे.
या उपग्रहांचा कसा होणार फायदा?
ईओएस-04
- हा रडार इमेजिंग उपग्रह आहे.
- त्याचा देशासाठी मोठा फायदा होणार आहे.
- याचा उपयोग पृथ्वीची उच्च दर्जाची छायाचित्रे घेण्यासाठी केला जाईल.
- यामुळे शेती, वनीकरण, वृक्षारोपण, जमिनीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता आणि पूरप्रवण क्षेत्रांचे नकाशे तयार करण्यात मदत होईल.
Launch of PSLV-C52/EOS-04 https://t.co/naTQFgbm7b
— ISRO (@isro) February 13, 2022
या मुख्य कृत्रिम उपग्रहाशिवाय शिवाय आणखी दोन उपग्रहही अवकाशात पाठवण्यात आले आहेत.
India’s Polar Satellite Launch Vehicle PSLV-C52 injected Earth Observation Satellite EOS-04, into an intended sun synchronous polar orbit of 529 km altitude at 06:17 hours IST on February 14, 2022 from Satish Dhawan Space Centre, SHAR, Sriharikota. https://t.co/BisacQP8Qf
— ISRO (@isro) February 14, 2022
इन्स्पायर सेट-1
- हा उपग्रह भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था म्हणजेच इस्त्रोने विकसित केला आहे.
- कोलोरॅडो विद्यापीठाच्या स्पेस फिजिक्स आणि अॅटमॉस्फेरिक प्रयोगशाळेच्या सहकार्याने हा उपग्रह विकसित केला आहे.
आयएनएस-2TD
- एकाच वेळी प्रक्षेपित होणारा इस्रोचा हा दुसरा उपग्रह आहे.
- भारत आणि भूतानचा संयुक्त उपग्रह INS-2V याच्या आधी तो विकसित करून पाठवण्यात आला आहे.
उपग्रह प्रक्षेपण यान PSLVचे ५४वे उड्डाण!
- PSLV हे भारताचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान आहे.
PSLVचे हे ५४ वे उड्डाण आहे.
6 PSOS-XL (स्ट्रॅप-ऑन मोटर्स) सह PSLV-XL कॉन्फिगरेशन वापरून २३वे मिशन आहे.
Congratulations to our space scientists on the successful launch of PSLV C52 mission. EOS-04 satellite will provide high resolution images under all weather conditions for agriculture, forestry and plantations, soil moisture and hydrology as well as flood mapping.
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2022