Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इस्रोची दिवाळी भेट! सर्वात जास्त वजनदार LVM3-M2 रॉकेटचं यशस्वी लाँचिंग!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Lift Rocket LVM3-M2

मुक्तपीठ टीम

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने भारतीयांना दिवाळीची उत्तम भेट दिली आहे. इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपले सर्वात वजनदार लिफ्ट रॉकेट LVM3-M2 प्रक्षेपित केले. इस्रोने या रॉकेटद्वारे ३६ ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.

सुमारे ४३.५ मीटर लांबीचे हे रॉकेट रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले. ८ हजार किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेला हा सर्वात वजनदार उपग्रह म्हणून ओळखला जातो. इस्रोने याचे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले होते कारण LVM3-M2 मिशन हे इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडसाठी पहिले समर्पित व्यावसायिक मिशन आहे.

भारताच्या वजनदार LVM3-M2 रॉकेटचे फिचर्स

  • इस्रोचे न्यूस्पेस इंडिया लिमिटेड हे वजनदार रॉकेट GSLV MKIII (LMV-3) प्रथमच व्यावसायिक उपग्रह लॉंच करत आहे.
  • याचे वजन हे ५ हजार ४०० किलोग्रॅम आहे.
  • यामधून ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेबचे ३६ छोटे संवाद उपग्रह (कम्युनिकेशन सॅटेलाईट) अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.
  • या कंपनीत एअरटेलची भारती एंटरप्रायजेस कंपनी ही शेअर होल्डर्स आहे.
  • उपग्रहाचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक आहे कारण, इस्रोकडून प्रक्षेपित होणारे हे पहिलेच व्यवसायिक प्रक्षेपण आहे.
  • LVM3 हे पहिल्यांदाच ५ टन वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत घेऊन जात आहे.

इस्रो आणि ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेब यांच्यात करार!

  • इस्रो आणि ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेब यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार LVM3 M2 या मिशनचे प्रक्षेपण करण्यात येत आहे.
  • या ऐतिहासिक प्रक्षेपणामुळे यूजर्संना कम्युनिकेशन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे.
  • यासाठी या कंपनीने पृथ्वीच्या कक्षामध्ये ६५० उपग्रह (MissionLVM3 M2) ठेवण्याची योजना आखली आहे.

न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि यूके-आधारित नेटवर्क ऍक्सेस असोसिएट्स लिमिटेड वनवेब लिमिटेड यांच्यातील व्यावसायिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून हे अभियान राबवले जात आहे.


Tags: Broadband Communication Satellitegood newsIndian Space Research OrganizationisroLift Rocket LVM3-M2muktpeethNewspace India Limitedइस्रोघडलं-बिघडलंचांगली बातमीन्यूस्पेस इंडिया लिमिटेडब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रहभारतीय अंतराळ संशोधन संस्थामुक्तपीठलिफ्ट रॉकेट LVM3-M2
Previous Post

भारत कोकिंग कोल लिमिटेडमध्ये ‘मेडिकल क्षेत्रात’ ४१ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने होणार – रविंद्र चव्हाण

Next Post
Public Works Minister Ravindra Chavan

दिवाळीचा 'आनंदाचा शिधा' वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने होणार - रविंद्र चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!