मुक्तपीठ टीम
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने भारतीयांना दिवाळीची उत्तम भेट दिली आहे. इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपले सर्वात वजनदार लिफ्ट रॉकेट LVM3-M2 प्रक्षेपित केले. इस्रोने या रॉकेटद्वारे ३६ ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.
सुमारे ४३.५ मीटर लांबीचे हे रॉकेट रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले. ८ हजार किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेला हा सर्वात वजनदार उपग्रह म्हणून ओळखला जातो. इस्रोने याचे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले होते कारण LVM3-M2 मिशन हे इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडसाठी पहिले समर्पित व्यावसायिक मिशन आहे.
भारताच्या वजनदार LVM3-M2 रॉकेटचे फिचर्स
- इस्रोचे न्यूस्पेस इंडिया लिमिटेड हे वजनदार रॉकेट GSLV MKIII (LMV-3) प्रथमच व्यावसायिक उपग्रह लॉंच करत आहे.
- याचे वजन हे ५ हजार ४०० किलोग्रॅम आहे.
- यामधून ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेबचे ३६ छोटे संवाद उपग्रह (कम्युनिकेशन सॅटेलाईट) अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.
- या कंपनीत एअरटेलची भारती एंटरप्रायजेस कंपनी ही शेअर होल्डर्स आहे.
- उपग्रहाचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक आहे कारण, इस्रोकडून प्रक्षेपित होणारे हे पहिलेच व्यवसायिक प्रक्षेपण आहे.
- LVM3 हे पहिल्यांदाच ५ टन वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत घेऊन जात आहे.
इस्रो आणि ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेब यांच्यात करार!
- इस्रो आणि ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेब यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार LVM3 M2 या मिशनचे प्रक्षेपण करण्यात येत आहे.
- या ऐतिहासिक प्रक्षेपणामुळे यूजर्संना कम्युनिकेशन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे.
- यासाठी या कंपनीने पृथ्वीच्या कक्षामध्ये ६५० उपग्रह (MissionLVM3 M2) ठेवण्याची योजना आखली आहे.
न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि यूके-आधारित नेटवर्क ऍक्सेस असोसिएट्स लिमिटेड वनवेब लिमिटेड यांच्यातील व्यावसायिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून हे अभियान राबवले जात आहे.