Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पीक विमा योजनेत करावयाच्या सुधारणांसाठी प्रस्ताव सादर करा –  कृषि मंत्री दादाजी भुसे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Agriculture Minister Dadaji Bhuse

मुक्तपीठ टीम

वातावरणीय बदल आणि नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांमुळे  शेती पिकांचे नुकसान होते. अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा योजनेत आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. या सुधारणांसाठी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

मंत्रालयात पीक विमा योजना अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धिरज कुमार, कृषि उपायुक्त विनयकुमार औटी यांची उपस्थिती होती.

 

कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेले राज्यातील लोकप्रतिनिधी, विविध शेतकरी संघटना, कृषी भूषण, शेतकरी प्रतिनिधी यांच्या पीक विम्याविषयी विविध सूचना आणि समस्या ऐकून जाणून घेतल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून बाहेर पडावे अशी मागणी यावेळी काही लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली.

 

शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना तयार करून त्यांची राज्य शासनाच्या वतीने प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकरी प्रतिनिधींनी सुचवलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. राज्य शासनाच्या अंतर्गत नसलेल्या विषयाशी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. संपूर्ण राज्यामध्ये बीड पॅटर्न राबविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल असे श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

 

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विमा दिला नाही अशा अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील तक्रार निवारण समितीचां आढावा घेण्यात येईल. शासनाने मान्य केल्यानुसार विमा कंपन्यानी विमा देणे आवश्यक आहे. जर विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिला नसेल राज्य शासनाचा हिस्स्याचा  त्यांना देण्यात येणारा दुसरा हप्ता देण्याविषयी विचार  करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. फळपिके इतर पीकांचा आणि विमा कंपन्यांविषयी शेतक-यांनी सुचना केल्यानुसार  सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

 

कृषी विभागाने प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांचे निरसन केले. सुरूवातीला पीक विमा योजना अंमलबजावणी सद्यस्थितीबाबतचे सादरीकरण करण्यात आले.


Tags: Agriculture Commissioner Dhiraj KumarAgriculture Department Principal Secretary Eknath DowleAgriculture Minister Dadaji BhuseCrop Insurance SchemeDepartment of AgricultureDeputy Commissioner of Agriculture Vinay Kumar AutiMinister of State for Agriculture Viswajit Kadammuktpeethकृषि आयुक्त धिरज कुमारकृषि उपायुक्त विनयकुमार औटीकृषि मंत्री दादाजी भुसेकृषि राज्यमंत्री विश्वजीत कदमकृषि विभाग प्रधान सचिव एकनाथ डवलेकृषी भूषणकृषी विभागपीक विमा योजनामुक्तपीठलोकप्रतिनिधीविविध शेतकरी संघटनाशेतकरी प्रतिनिधी
Previous Post

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

Next Post

यूपीच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा उल्लेख का?

Next Post
Yogi Adityanath

यूपीच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा उल्लेख का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!