Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पुस्तकातील व्यक्तीच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळेल”

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते समाज भूषण पुस्तकाचे प्रकाशन

September 27, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Subash Desai

मुक्तपीठ टीम

‘समाज भूषण’ या देवेंद्र भूजबळ यांनी संपादीत केलेल्या पुस्तकातील व्यक्तींच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. स्वयंप्रेरणेने आणि समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या लोकांना सर्वांसमोर आणण्याचे काम या पुस्तकाने केले आहे, असे उद्‍गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज काढले.

 

भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशीत माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भूजबळ यांनी लेखन आणि संपादन केलेल्या ‘समाज भुषण’ या पुस्तकाचे आज मंत्रालयात मराठी भाषा मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक गणेश रामदासी, दयानंद कांबळे, उपसंचालक गोविंद अहंकारी, देवेंद्र भूजबळ, अलका भुजबळ यांच्यासह भरारी प्रकाशनच्या श्रीमती लता गुठे उपस्थीत होत्या.

 

देसाई पुढे म्हणाले, प्रत्येक समाजातील घटक मिळून भारतीय समाज व्यवस्था तयार झाली आहे. यात प्रत्येकाचं काम ठरलेले असायचे. कासार समाजातील लोकांनी पुर्वापार बांगड्या भरण्याचा व्यवसाय केला आहे. या समाजाची मुळ प्रवृत्ती उद्योजकाची आहे. आज या समाजातील अनेक लोक समर्पित भावनेने कार्य करत विविध क्षेत्रात नावारुपाला आली आहेत. अशा लोकांचा आदर्श समाजापुढे आणाण्याचे काम या पुस्तकाच्या निमित्ताने झाले आहे. अशा अनेक व्यक्ती अजुनही प्रकाशात आल्या नसतील तरी त्यांच्या कार्याचा उल्लेख असलेले पुस्तकांचे अनेक खंड प्रकाशित व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करुन पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखकाचे आणि प्रकाशकांचे देसाई यांनी अभिनंदन केले.

 

यावेळी बोलताना डॉ. पांढरपट्टे म्हणाले, कासार समाजातील व्यक्तींनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. या सर्वांची प्रातिनिधिक माहिती समाज भूषण या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या हाती आली आहे. अलका भुजबळ यांनी कॅन्सरसारख्या आजारावर मात केली, भुजबळ यांनी हालाखीच्या परिस्थीतून वर येत संचालक पदापर्यंत काम केले आहे. ते नोकरीतून निवृत्त झाले असले तरी त्यांनी लेखन सेवा सुरु ठेवली आहे याचा उल्लेख करुन पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या .

 

निवृत्त झाल्यानंतरही सतत चिंतन मनन आणि लेखन करणारे, माजी संचालक भुजबळ यांच्या कामातून प्रेरणा मिळत असते असे सांगून संचालक रामदासी यांनी पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा दिल्या. लातूर पासून ते मलेशियापर्यंतच्या कर्तुत्वान लोकांना या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणण्याचे काम समाज भुषण या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा नातू यांनी केले तर आभार प्रकाशक लता गुठे यांनी व्यक्त केले.

 

भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशित ३५ यशकथांचा संग्रह असलेले समाज भुषण हे पुस्तक आज प्रकाशित झाले. कासार समाजातील बंधु भगिनींच्या यशकथांचे संकलन यात करण्यात आले आहे. सुहास भागवत यांचे मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे २०० वे पुस्तक आहे.


Tags: samaj bhushansubhash desaiसमाज भूषणसुभाष देसाई
Previous Post

“पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

“मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!