Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“खिसा फाटलाय…मायबाप सरकार फी कुठून भरायची?”

शैक्षणिक शुल्कावरुन राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी, मंत्रालयाबाहेर ठिय्या देणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
AISF

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटामुळे राज्यातील गरीबच नाहीत तर सर्वसामान्यांचंही आर्थिक कंबरडं मोडलं गेलं आहे. कोरोना बाधा झालेल्या कुटुंबांवर दिवाळखोरीसारखी परिस्थिती ओढवली आहे. तरीही लॉकडाऊनच्या काळातही शाळा, महाविद्यालयांकडून फी वसुलीसाठी तगादा लावला जातो आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी खदखदत आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (AISF) या नाराजीकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. पण आता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी पुढचं पाऊल उचलत थेट मुंबईत धडक देण्यात येणार आहे. ५ जुलैला मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. लोकांचा खिसा कोरोनानं फाटला असताना सरकारनंच विचार करावा की फी कुठून भरणार, असा रोकडा सवाल विचारला जात आहे.

 

काय आहे AISF चं म्हणणं?

  • लॉकडाऊनच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले.
  • चाकरमान्यांपासून, मजुरी करणाऱ्यांपर्यंत सर्वांचे हाल झाले.
  • त्यात पाल्यांच्या शिक्षणाच्या खर्चाने सर्व जण बेजार झालेत.
  • शिक्षण घेणं अवघड झालेलं असताना फी वसुलीसाठी तगादा लावला जातोय.
  • याचा विचार करता सरकारने त्वरित सरसकट शैक्षणिक फी माफ करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.

 

AISF चा आंदोलनाचा इशारा

  • नाशिकमधल्या आंदोलनात संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
  • आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  • आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
  • मागण्या मान्य करा, अन्यथा ५ जुलैला मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 

हेही वाचा: विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास कठोर कारवाई!

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास कठोर कारवाई!


Tags: AISFcoronaऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनकोरोना
Previous Post

कोरोना मृत्यू झाल्यास नातेवाईकांना नुकसानभरपाई!

Next Post

“बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
BDD

"बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!