मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर दहावी आणि बारावीचे विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे.
यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यायची विद्यार्थ्यांची मागणी
- शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियाव विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
- शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे.
- दरम्यान, ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
- धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत.
- यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.
पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीमार
- सुरूवातील विद्यार्थ्यांना समजावण्याच प्रयत्न केला मात्र आक्रमक विद्यार्थी काही केल्या ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.
- यावेळी विद्यार्थ्यांनी पळापळ सुरू केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
- पोलिसांच्या लाठीमारानंतर विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा संपूर्ण परिसराचा चार्ज घेतला होता.
- त्यानंतर पोलिसांनी मोठा फौजपाटा बोलवला.
आम्ही चर्चेसाठी तयार आहोत– वर्षा गायकवाड
- परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत.
- संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणं योग्य नाही.
- काही गोष्टी बोलायच्या असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात.
- आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.
- त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू.
- विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे.