Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या प्रगतीला महत्व देणारा अर्थसंकल्प-वर्षा गायकवाड

March 9, 2021
in सरकारी बातम्या
0
Varsha gaikwad

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे राज्याच्या महसुलामध्ये घट असतानाही शालेय शिक्षण विभागाला विविध योजनांसाठी गेल्या वर्षी २००० कोटी वरून २१४० कोटींची तरतूद करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला महत्व दिले असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या इमारतींची, वर्गखोल्यांची पुनर्बांधणी व दुरूस्ती याकरिता तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

 

या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सुरक्षित वातावरणात उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आनंददायी वातावरण, द्विभाषिक पुस्तके, ग्रंथालये उभारणी, शारीरिक व क्रीडा विकास, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षांचे कलचाचणी , डिजीटल शिक्षण, कौशल्य विकसित करणे. नियमित मुल्यांकन उत्कृष्ट शिक्षकांचे मार्गदर्शन याद्वारे शाळांचा शैक्षणिक व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार.

 

स्टार्सयोजना
राज्यातील शिक्षण पद्धतीची अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासाठी पूर्व प्राथमिक ते बारावी दर्जेदार शिक्षण देणे, अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, सामाजिक, लिंग भेदभाव न करता शिक्षणाचा दर्जा राखणे या सर्व बाबींचा समावेश सर्व पातळीवर करून ठरावीक दर्जाचे शिक्षण देणे अंतर्भुत केले. विशेष गरजा असलेली बालके, मुली, आणि वंचित समुदायातील विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

 

यामध्ये शिक्षकांचा विकास शाळेच्या वर्गातील अध्ययन पद्धतीत सुधारणा, शाळेचे नेतृत्व, शाळा ते काम / शाळा ते उच्च शिक्षण हे संक्रमण सुलभ करणे, प्रगत सेवा पुरवण्यासाठी प्रशासन व विकेंद्री व्यवस्थापन करणे अशा गोष्टी यामध्ये समाविष्ट केल्या आहेत.९६७ कोटी ३९  लाख किंमतीच्या योजनेस अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.
सातारा सैनिकी शाळेचे आधुनिकीकरण

 

सैनिकी शाळा सातारा या शाळेचे आधुनिकीकरण स्वर्गीय यशवंत चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून  १९६१ मध्ये सातारा येथे सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. या शाळेच्या स्थापनेपासुन अनेक विद्यार्थ्यांची सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे. अशा या शाळेचे आधुनिकीकरण करण्यासाठी३०० कोटी चा विकास आराखडा तयार करण्यात आला असून सन२०-२१ साठी १०० कोटी नियत व्यय मंजूर करण्यात आले. या विकास आराखड्यामध्ये मुलांचे दर्जेदार वसतीगृह, आधुनिक इमारती व दर्जेदार शारीरिक शिक्षणाचे क्रिडांगण व अन्य बाबींचा विकास करण्यात येणार आहे.

भारतरत्न राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क

 

विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, विज्ञानातून आनंद व मौज निर्माण करणे. २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करणे यासाठी ‘ राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क ’ उभारण्यास परवानगी देण्यात आली असून प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजित आहे, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.


Tags: ECONOMYeducationEducation Minister Varsha Gaikwadmuktpeethअर्थसंकल्पमुक्तपीठशिक्षणशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Previous Post

ठाकरे सरकारच्या महसूलमंत्र्यांवर गंभीर आरोप करून शिवसेना खासदार दिल्लीला

Next Post

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांमुळे आघाडी सरकार अडचणीत

Next Post
aaghadi government Vaze

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांमुळे आघाडी सरकार अडचणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!