मुक्तपीठ टीम
तरुणांच्या कल्पनाशक्तीला साधनांची साथ दिली तर ते अनेकदा अचाट आणि अफाट करुन दाखवतात. सध्या जेथे तेथे ईलेक्ट्रिक वाहनांची चर्चा आहे. त्यातही पेट्रोल डिझेल महागाईमुळे नेहमीच्या बाइकपेक्षा ई-बाइककडे कल वाढतोय. त्याचवेळी एका विद्यार्थ्यानं चक्क सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल तयार केली आहे. म्हणजे विजेचाही खर्च नाही!
इच्छा शक्ती प्रबळ असेल तर मर्यादित साधनांच्या सहाय्याने मोठी कामगिरी बजावणं अशक्य नसतं. आपण नेहमीच हे बोलतो, ऐकतो. पण मदुरैमधील एका विद्यार्थ्याने हे करून दाखवलं आहे. या विद्यार्थाने सूर्याच्या प्रकाशावर चालणारी इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. याचाच अर्थ या सायकलला विजेनं चार्ज करण्याची गरज पडणार नाही. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येताच ही सायकल स्वत:च चार्ज होईल.
धनुषची सोलर सायकल!
• ज्या विद्यार्थाने सूर्य किरणांवर चालणारी ही इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे, त्या विद्यार्थ्याचे नाव धनुष कुमार आहे.
• धनुष मदुरैमध्ये बीएससी फिजिक्सच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे.
• धनुषने स्वत: ही इलेक्ट्रिक सायकल डिझाईन करुन तयार केली आहे.
• धनुषने जी इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे, ती २४ व्होल्ट आणि २६ अॅम्पिअर बॅटरीसह आहे.
• तसेच सोलर पॅनलच्या मदतीने ही इलेक्ट्रिक सायकल ५० किमीपर्यंत धावू शकते.
• बॅटरी कमी असली तरी ही सायकल २० किमीपर्यंत धावू शकते.
स्वस्त आणि मस्त!
• जर सूर्य नसेल तर नेहमीच्या वीजेवरही या सायकलची बॅटरी चार्ज करता येईल.
• धनुषच्या या सायकलच्या बॅटरीसाठी वापरली जाणाऱ्या वीजेवरील खर्च पेट्रोलच्या किंमतीपेक्षा तुलनेने फारच कमी आहे.
• ५० किमीपर्यंत चालणासाठी फक्त १.५० रुपये खर्च होतात.
• तसेच ही सायकल ३० ते ४० किमीच्या वेगावे सहज धावू शकते.