Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बालपणी पोलिओनं रोखलं, गरिबीनं सतावलं, तरीही भाविनानं जग जिंकलं!

August 30, 2021
in featured, चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
bhavina patel gnm

मुक्तपीठ टीम

आपल्या भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या टेबल टेनिसचे रौप्य पदक पटकावले. भाविनावर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या अद्वितीय यशामागे आहे तिचा प्रतिकुलतेशी झुंजत झालेला संघर्षमय प्रवास. तिची संघर्षमय यशोगाथा प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी. कारण तिला इथं पोहोचण्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागले.

 

जन्मानंतर १२व्या महिन्यात झाली होती पोलिओची शिकार

  • भाविना पटेलचा जन्म ६ नोव्हेंबर १९८६ रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडगर या छोट्या गावात झाला.
  • जन्मानंतर अवघ्या १२ महिन्यांनी तिला पोलिओने ग्रासले.
  • पाच जणांच्या कुटुंबात तिचे वडील एकमेव कमावणारे होते.
  • परिस्थिती तशी बेताची असल्याने वडिलांना आपल्या मुलीवर उपचार करता आले नाही.
  • यानंतर, तिच्यावर विशाखापट्टणमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

टेबल टेनिसमध्ये केले करिअर

  • गरिबी आणि पोलिओशी झुंज देत असूनही भाविनाने कधीही हार मानली नाही.
  • तिने मन रमवण्यासाठी म्हणून टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. व्हीलचेअरवर बसून टेबल टेनिस खेळत असताना तिने त्यात करिअर करण्याचा विचार केला, ज्यात ती यशस्वी झाली.
  • २०११ मध्ये पीटीटी थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर तिने प्रसिद्धी मिळवली.
  • त्यानंतर तिने ऑक्टोबर २०१३ मध्ये बीजिंग आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरी स्पर्धा क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला.
  • त्यावेळी ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू होती.

 

भाविनाचे देदिप्यमान पुनरागमन

  • चार वर्षानंतर, भाविनाने २०१७ मध्ये पुन्हा एकदा बीजिंगमध्ये चमत्कार घडवला.
  • तिने आशियाई पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवले.
  • भाविना ही क्लास ४ ची पॅरा अॅथलीट आहे.
  • क्लास ४ श्रेणीतील खेळाडू हे पाठीचा कणा कमजोर झाल्यामुळे किंवा सेरेब्रल पाल्सीमुळे कमजोर असू शकतात.

 

उल्लेखनीय बाब अशी की आता जागतिक यशानंतर तिचं कौतुक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी २०१०मध्येही तिला दुसरी खेळाडू प्रोत्साहन दिलं होतं. आज त्यांचा भाविनासोबतचा फोटो त्यामुळे व्हायरल झाला. भविष्यातही आपल्या भाविनानं असंच यश मिळवावं, यासाठी मुक्तपीठच्या आभाळभर शुभेच्छा.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bhavina patelPM Narendra modiTokyo Paralympicsटोकियो पॅरालिम्पिकपंतप्रधान नरेंद्र मोदीभाविना पटेलरौप्य पदक
Previous Post

गर्दी जमवण्याची चिथावणी देणाऱ्या अण्णा हजारेंच्या नगर जिल्ह्यात २४ तासात ७३२ नवे रुग्ण!  १२ मृत्यू!

Next Post

आदित्य नारायणने आरामाची होस्टगिरी सोडली, बालपणीचं स्वप्न साकारणार!

Next Post
aditya narayan gnm2

आदित्य नारायणने आरामाची होस्टगिरी सोडली, बालपणीचं स्वप्न साकारणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!