मुक्तपीठ टीम
फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाचा विजय झालेला आहे. लिओनेल मेस्सीने लहानपणापासून पाहिलेले स्वप्नही पूर्ण झाले आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू मॅराडोनाने १९८६मध्ये आपल्या संघाला विश्व विजेता बनवले होते त्यावेळी लिओनेल मेस्सीनेही असेच स्वप्न पाहिले होते. चार विश्वचषकांमधून ट्रॉफीच्या शोधात असलेल्या मेस्सीने २०१४ मध्ये संघाला अंतिम फेरीत नेहले होते, पण तो जिंकू शकला नाही, मात्र यावेळी त्याचे स्वप्न साकार झाले.
यापूर्वी मेस्सीने सांगितले होते की कतारमधील ही स्पर्धा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल आणि तो शेवटचा सामना म्हणून हा अंतिम सामना खेळेल. परंतु, फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयानंतर लिओनेल मेस्सीने निवृत्तीचा विचारही बदलला आहे. जगज्जेता म्हणून अजून काही सामने खेळायचे असल्याचे मेस्सीने सांगितले.
जगभरात गाजणाऱ्या मेस्सीच्या यशामागची संघर्ष गाथा….
- लिओनेल मेस्सीचा जन्म २४ जून १९८७ रोजी अर्जेंटिनामधील रोझारियो येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
- मेस्सीचे वडील एका कारखान्यात मजूर होते आणि त्यांचे काम साफसफाईचे होते.
- तसेच, वयाच्या पाचव्या वर्षी मेस्सीने त्याचे वडील जॉर्ज यांच्या प्रशिक्षित स्थानिक क्लब ग्रँडोलीकडून फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली.
- १९९५मध्ये, मेस्सीने त्याच्या मूळ गावी रोझारियो येथे नेवेलच्या ओल्ड बॉईजकडून खेळण्यास सुरुवात केली, परंतु वयाच्या ११व्या वर्षी त्याला गंभीर आजार झाल्याचे निदान झाले, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाची निराशा झाली.
- या आजाराचे नाव ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी असे होते.
- फुटबॉल क्लब बार्सिलोनाच्या निर्णयानंतर मेस्सीचे नशीब बदलले
- मात्र, मेस्सीचा आजार समोर आल्यावर कुटुंबासमोर अनेक आव्हाने उभी राहिली.
- त्याच्या पालकांनी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, फुटबॉल क्लब बार्सिलोना मेस्सीच्या उपचारासाठी पुढे आला.
- बार्सिलोनाचे क्रीडा संचालक कार्लेस रिक्सॅक यांना मेस्सीच्या प्रतिभेची माहिती देण्यात आली. ज्यानंतर बार्सिलोनाने त्याला करारावर स्वाक्षरी करायला लावले, त्यानंतर मेस्सी आणि त्याच्या कुटुंबाला अर्जेंटिना सोडून स्पेनला यावे लागले.
- मेस्सीचे कुटुंब युरोपला गेले आणि तो क्लबच्या युवा संघांमध्ये खेळू लागला.
लिओनेल मेस्सीने २००४-०५ मध्ये १७व्या वर्षी बार्सिलोना क्लबसाठी पदार्पण केले. त्याने पहिला गोल १ मे २००५ रोजी अल्बासेटविरुद्ध केला. यानंतर मेस्सीने अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून खेळायला सुरुवात केली. २०१२मध्ये मेस्सीने एका वर्षात ९१ गोल केले होते, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही खेळाडूने एका वर्षात इतके गोल केले नव्हते.
मेस्सीची तुलना मॅराडोनाशी करण्यात आली. मेस्सीने अर्जेंटिनासाठी पाच विश्वचषक खेळले आहेत. याआधी २०१४ मध्ये अर्जेंटिनाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जर्मनीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, मेस्सी जेव्हाही कोणत्याही मोठ्या स्पर्धेत उतरला तेव्हा त्याची तुलना मॅराडोनाशी केली गेली, पण त्यातही एकच कमतरता होती, ती म्हणजे संघाला विश्वचषक मिळवून देणे. परंतु, कतारमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात मेस्सीने हे टास्क पूर्ण केले आणि ३६ वर्षांनंतर अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला.
“वर्ल्ड चॅम्पियन मला खेळायचे आहे”- मेस्सी
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याबाबत मेस्सीचे विचार बदलले आहेत. कतारमध्ये झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर ४-२ असा विजय मिळविल्यानंतर मेस्सी म्हणाला, “मला ही ट्रॉफी अर्जेंटिनाला घेऊन जायची आहे आणि इतर सर्वांसोबत त्याचा आनंद लुटायचा आहे. मला सध्या वर्ल्ड चॅम्पियन म्हणून खेळायचे आहे.”