Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागरिक-स्नेही उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील चार शहरांचा केंद्राकडून गौरव

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Street for people

मुक्तपीठ टीम

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ चॅलेंज अर्थात जनतेसाठी पदपथ या स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेअंती ११ शहरांना पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या ४ शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 38 शहरांचे प्रस्ताव दाखल झाले होते.

 

शहरांतील वाहन-केंद्री रस्त्यांचे लोक-केंद्री रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्याच्या हेतूने वर्ष २००६ मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणातील शिफारसींच्या धर्तीवर २०२० पासून सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट शहरे मोहिमेमध्ये सार्वजनिक जागा अधिक लोक-स्नेही बनविण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात येतात.

 

‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेत परीक्षकांनी पुढील फेरीत प्रवेश करणाऱ्या 11 शहरांची निवड केली असून त्यांना मंत्रालयातर्फे प्रत्येकी ५० लाख रुपयांचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयटीडीपी अर्थात वाहतूक आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान विषयक मदत घेण्यात आली.

 

‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शहरांनी आघाडी घेतली असून ज्या चार शहरांची पुढच्या फेरीसाठी निवड झाली त्या शहरांतील उपक्रमांचा तपशील खाली दिला आहे.

 

पुणे

पुणे प्रशासनाने अनेक रस्त्यांच्या, बाजूच्या मोकळ्या जागा वापरून नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन विभाग तयार केले. रस्त्यांच्या बाजूच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढणे, परिसरात हास्यवर्गांचे, संगीत सत्रांचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा निर्माण करणे अशा अनेक नव्या उपक्रमांनी रस्त्यांच्या आजूबाजूची जागा उपयोगात आणण्यात आली.

 

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड प्रशासनाने त्यांच्या रस्ते रचनाकारांशी सल्लामसलत करून त्यांच्या शहरामधील हिरवाईच्या जागांना जोडणाऱ्या शहरव्यापी हरित सेतू महायोजनेची आखणी केली. गाड्यांच्या रस्त्यांचे विभाजन करून सायकल मार्ग आणि पदपथासाठी वेगळ्या मार्गांची निर्मिती देखील प्रायोगिक तत्वावर करण्यात आली. या शहरात चालणे आणि सायकल चालविणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुधारणा केल्या आहेत.

 

रस्त्यांचा वापर कारसारख्या वाहनांऐवजी नागरिकांना मुक्तपणे वापरू देण्यासाठी सर्व सार्वजनिक संस्था आणि इतर भागधारकांमध्ये एकमत घडवून आणण्यात औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन यशस्वी ठरले. मोकळ्या रस्त्यांना सुशोभित करण्यासह नागरिकांना कमी शुल्कात, रस्त्यांच्या कडेला विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच चालणाऱ्या आणि सायकल चालविणाऱ्यांसाठी रस्त्यांची उत्तम सोय करणे असे उपक्रम प्रशासनाने राबविले.

 

नागपूर शहरातील सीताबर्डी आणि साक्कदरा या अत्यंत गर्दीच्या बाजारांमध्ये चालणाऱ्या लोकांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर शहर प्रशासनाने रस्त्यांच्या धोरणात्मक पुनर्रचना केल्या. शहरातील रस्त्यांच्या लगत विविध रंग वापरून चित्रे, जुने टायर वापरून बसण्याची ठिकाणे तसेच टाकाऊ धातूच्या वस्तूंपासून नव्या पदपथांची सीमा आखणे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि इतर संबंधितांची मदत घेण्यात आली.

 

या स्पर्धेतील काही विजेत्या शहरांनी पुढील संकल्पना राबविल्या –

गुरगाव शहरातील शाळांचे परिसर तसेच बाजाराची ठिकाणे केवळ पादचाऱ्यांसाठी राखीव करण्यात आले असून उज्जैन शहराने कारमुक्त विभाग निर्माण केला, उदयपुर शहराने स्थानिक बस स्थानकाकडे येणाऱ्या वाहतुकीची पुनर्रचना केली, कर्नाल शहराने ओसाड जागा आणि उड्डाणपूलाखालील जागांना रंगीबेरंगी कलाकृतींनी जिवंत केले. तर कोहिमाने कलाकृती प्रदर्शनासाठी वस्तूसंग्रहालयाची कल्पना राबविली.

 

केंद्र सरकारने ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाची घोषणा केली आहे. पहिल्या फेरीतील 11 विजेती शहरे वगळता कोणतीही स्मार्ट शहरे, राजधानीची शहरे किंवा 5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

 

अधिक तपशीलासाठी कृपया या संकेतस्थळाला भेट द्या:

Homepage

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: central GovernmentCitizen-friendly venturesgood newsindiastreetchallengeMaharashtramuktpeethsmartnet.niuaStreets for PeopleUnion Ministry of Housing and Urban Affairsकेंद्र शासनकेंद्र सरकारकेंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयचांगल्या बातम्यानागरिक-स्नेही उपक्रममहाराष्ट्रमुक्तपीठस्ट्रीट्स फॉर पीपल
Previous Post

जानेवारीअखेरीस मुंबईतील दोन मेट्रो मार्गांवरील रुळाचं काम पूर्ण!

Next Post

UIDAIचं अस्सल ‘आधार’ पीव्हीसी कार्ड फक्त ५० रुपयांमध्ये! असं मिळवा…

Next Post
Aadhaar PVC card

UIDAIचं अस्सल 'आधार' पीव्हीसी कार्ड फक्त ५० रुपयांमध्ये! असं मिळवा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!