नाशिकमधील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डमधील काही रस्त्यांवर दिवे नाहीत. सूर्यास्तानंतर तेथील नागरिकांना रस्त्यांवर चालणं अवघड तसंच धोक्याचं जातं. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतरही कॅन्टोमेंट बोर्डाकडे निधी नसल्याने दिवे लावणे शक्य होतं नव्हतं. अखेर नगरसेवक आशा गोडसे आणि त्यांचा पती चंद्रकांत गोडसे यांनी काही नागरिकांकडून निधी गोळा केला. त्यातून खर्च करून तब्बल दीड लाखांचे पथदिवे या परिसरात बसवले आहेत.
कोरोना संकटामुळे देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाकडे विकासकामांसाठी सध्या निधी अपुरा आहे. तेथील प्रगतीची कामे मागे पडली आहेत. त्यामुळे नाशिक येथील लॉम रोड परिसरा पथदिवे बसविण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं नगरसेवकांनी वेगळी शक्कल लढवली. काही दानशुरांकडून निधी जमवून दिवे लावण्यात आले. लॉम रोडला जोडणाऱ्या गोल्ड कॉईन लेनवर दिवे बसवले आहेत.
याबद्दल चंद्रकांत गोडसे म्हणाले की, आर्थिक पेच लक्षात घेता मंडळाला विकासकामे करणे अवघड होत आहे. देवळाली कॅम्प क्षेत्रात असे काही लोक आहेत, जे समोर न येता नागरिकांच्या हितासाठी पैसे देत आहेत. सूर्यास्तानंतर नागरिकांनी रस्ता वापरण्यासाठी होणाऱ्या गैरसोय होत असे. ही समस्या सोडवण्यासाठी काही जबाबदार नागरिकांनी देणग्या दिल्या. त्यामुळे पथदिवे बसवण्यास मदत झाली.