Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत व आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची ‘स्टेलॅन्टिस’कडून घोषणा

April 27, 2021
in प्रेस रिलिज
0
stellantis

मुक्तपीठ टीम

 

‘स्टेलॅन्टिस इंडिया अॅंड एशिया पॅसिफिक’तर्फे तिच्या भारत आणि परिसरातील कामकाजासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुका आज जाहीर करण्यात आल्या.

 

भारतात ‘स्टेलॅन्टिस’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक या पदांवर रोलँड बुशाहा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे ‘जीप’ आणि ‘सिट्रोएन’च्या राष्ट्रीय विक्री कंपन्यांची (एनएससी), तसेच समुहाच्या उत्पादनाच्या कामकाजाची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

 

रोलॅंड यांनी ‘सिट्रोएन इंडिया’च्या सेल्स व मार्केटिंग या विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने या ब्रॅंडचे कामकाज २०१७ पासून यशस्वीपणे सांभाळले आहे. सिट्रोएन हा ब्रँड आणि ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस’ ही नवीन गाडी यांचे भारतात नुकतेच सादरीकरण झाले. त्याची संपूर्ण अंमलबजावणी रोलॅंड यांनी केलेली आहे.

Roland Bouchara,

आंतरराष्ट्रीय वाहन उद्योग आणि सल्लामसलत या व्यवसायात रोलँड यांचा मजबूत आणि वैविध्यपूर्ण अनुभव आहे. २०१७ मध्ये ‘ग्रुप पीएसए’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी, रोलँड यांनी ‘रेनॉ’ येथे अनेक महत्त्वाची पदे भूषविली. यामध्ये, मॅनेजिंग डायरेक्टर यूके, यूरोप एनएससीचे प्रमुख (जर्मनी, यूके, स्पेन व इटली) आणि एसव्हीपी सेल्स अॅंड मार्केटिंग (आशिया पॅसिफिक व चीन) या पदांचा समावेश होता.

 

डॉ. पार्थ दत्ता यांच्याकडे भारत व आशिया पॅसिफिक विभागातील अभियांत्रिकी, डिझाईन, संशोधन आणि विकास (आर अॅंड डी) यांच्या कार्यवाहीची जबाबदारी देण्यात आली आहे. पार्थ यांनी ‘एफसीए इंडिया’चे प्रेसिडेंट व व्यवस्थापकीय संचालक या पदांवर २०१९ पासून काम केले आहे. नवीन ‘जीप कम्पास’ आणि स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यात आलेली ‘जीप रॅंगलर’ यांच्या यशस्वी सादरीकरणात त्यांचा मोलाचा वाटा होता.

Dr. Partha Datta,

पार्थ यांनी ‘एफसीए’मध्ये अभियंता म्हणून १९९९मध्ये प्रवेश केला. गेल्या वीस वर्षांमध्ये त्यांनी तेथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक व व्यावसायिक कामकाज, प्रशासन, व्यवसाय विकास प्रकल्प, अभियांत्रिकी आणि वाहन जुळणी या विभागांत वरिष्ठ पातळीवर काम केले. ‘एफसीए’मधील कार्यकाळात पार्थ हे चेन्नई आणि पुणे येथील तांत्रिक केंद्रांचे संचालक तसेच चीनमधील उत्पादन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुखही होते.

 

‘स्टेलॅन्टिस इंडिया अॅंड एशिया पॅसिफिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्ल स्माइली यांनी आज या नियुक्त्यांची घोषणा केली.

Carl Smiley

“रोलँड आणि पार्थ यांच्या स्टेलॅन्टिसमधील जबाबदाऱ्यांची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय विक्री व विपणन अधिकारी म्हणून यशस्वी ठरलेले रोलँड हे भारतात मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक या नवीन भूमिकेमध्ये आपला व्यावसायिक अनुभव उपयोगात आणतील. कंपनीच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठ जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने, ‘स्टेलॅन्टिस’चा ब्रँड, नेटवर्क आणि व्यावसायिक कामकाज यांचा भारतात विकास व विस्तार करण्याची जबाबदारी रोलॅंड यांच्यावर असणार आहे.”

“पार्थ यांच्याकडे नावीन्यता आणि उत्पादन विकास यांचा व्यापक अनुभव आहे. त्या दृष्टीने ‘स्टेलॅन्टिस’च्या अभियांत्रिकी, डिझाइन आणि संशोधन व विकास या विभागांचे नेतृत्व करण्यास पार्थ हे आदर्श उमेदवार आहेत. ‘जीप’ या ब्रँडची स्थानिक उत्पादन योजना भारतामध्ये वितरीत करण्यात पार्थ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्या अनुषंगाने, स्थानिक उत्पादनाची रणनीती आखण्यासाठी नेमलेल्या संघाचे नेतृत्व पार्थ करतील आणि विकासासाठी नवीन संधीही शोधून काढतील,” असे स्माइली म्हणाले.

रोलँड आणि पार्थ हे दोघेही आपापल्या नवीन पदांवर त्वरीत रुजू झाले आहेत.

‘स्टेलॅन्टिस’विषयी

  • स्टेलॅन्टिस ही जगातील एक आघाडीची वाहन उत्पादक आणि मोबिलिटी पुरविणारी कंपनी आहे.
  • विशिष्ट, परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह मोबिलिटी सोल्यूशन्सच्या माध्यमातून ती प्रवासाचे स्वातंत्र्य देऊ करते.
  • या समुहाचा समृद्ध वारसा आणि व्यापक भौगोलिक उपस्थिती यांव्यतिरिक्त, चिरंतन कामगिरी, अनुभवाची खोली आणि जगभरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विविधांगी प्रतिभा ही या कंपनीची सर्वात मोठी ताकद आहे.
  • ‘स्टेलॅन्टिस’च्या विस्तृत आणि आयकॉनिक ब्रँडच्या पोर्टफोलिओचा लाभ ही कंपनी सर्वांना मिळवून देईल.
  • कंपनीच्या द्रष्ट्या संस्थापकांनी मोठ्या उत्कटतेने व स्पर्धात्मक भावनेने विशिष्ट दर्जाच्या वाहनांची निर्मिती करून हा ब्रॅंड नावारुपास आणला आहे.
  • या भावनेशी कंपनीचे कर्मचारी व ग्राहक एकरूप होत असतात.
  • “आपण श्रेष्ठ बनायचे, मोठे नव्हे,” अशी ‘स्टेलॅन्टिस’ची आकांक्षा आहे.
  • त्यातूनच ती आपल्या सर्व भागधारकांसाठी, तसेच ज्या समुदायात ती कार्यरत आहे, तिच्यासाठी जोडले जाणारे मूल्य तयार करीत असते.

Tags: आशिया पॅसिफिकडॉ. पार्थ दत्ताभारतरोलँड बुशाहास्टेलॅन्टिस
Previous Post

विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

Next Post

“राज्यात पावणे सहा कोटी तरुणांसाठी १२ कोटी लसींची गरज, लसींची उपलब्धता हेच आव्हान!”

Next Post
vaccination

"राज्यात पावणे सहा कोटी तरुणांसाठी १२ कोटी लसींची गरज, लसींची उपलब्धता हेच आव्हान!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!