मुक्तपीठ टीम
देशभरात केवायसी फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सर्तक राहण्यास सांगितले आहे. या संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटच्या माध्यमातून अलर्ट जारी केला आहे. ज्यात बँकेने आपल्या ग्राहकांना सूचना वजा इशारा दिला आहे की, केवायसी फसवणुकीच्या प्रकरणात, फसवणूक करणारे ग्राहकांना बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून वैयक्तिक माहिती जाणून घेण्यासाठी एक टेक्स्ट मेसेज पाठवत आहेत.
अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यानच्या लॉकडाऊन निर्बंधांमुळे केवायसी अपडेट करण्यासाठी ईमेल किंवा पोस्टद्वारे कागदपत्रे स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. तसेच बँकेने ग्राहकांना https://www.cybercrime.gov.in/ वर अशा सर्व ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांची नोंद करण्यास सांगितलं आहे.
The reality of KYC fraud has proliferated across the country. The target is sent a text message asking to update their #KYC by clicking on a link by someone acting as a bank/company representative.
Report such scams at https://t.co/3Dh42iwLvh#CyberCrime #StaySafeStayVigilant pic.twitter.com/Z2UGRFYrol
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 26, 2021
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने केवायसी फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन खाती सुरक्षित ठेवण्यासाठी तीन सूचनांचे अनुकरण करण्यास सांगितले आहे, त्या खालील प्रमाणे..
• सर्वप्रथम कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.
• बँकेकडून केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठवली जात नाही.
• तसेच आपला मोबाइल नंबर आणि वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करु नका.