Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून पहिला स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह! वाचा कसं व्हायचं सहभागी?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
start up india

मुक्तपीठ टीम

आजपासून देशातील पहिला स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. १६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात देशातील प्रमुख स्टार्टअप्स, उद्योजक, गुंतवणूकदार, इनक्यूबेटर, आर्थिक सहाय्य करणाऱ्या संस्था, बँका, धोरणकर्ते इत्यादींना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले गेले आहे. भारतात स्वयंउद्यमशीलता आणि नवोन्मेशाला उत्तेजन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात कसे सहभागी व्हायचे त्यासाठी आवश्यक लिंक बातमीत देण्यात आली आहे.

 

उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभाग (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, DPIIT)यांच्या वतीने आजपासून १६ जानेवारीपर्यंत या कालावधीत प्रथमच स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह आयोजित केला गेला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे नवनिर्मिती सप्ताह साजरा करण्याचे उद्दिष्ट असून संपूर्ण भारतात उद्योजकतेची व्याप्ती प्रसार आणि त्याची सखोल स्तरावर रुजवणूक बघण्याची संधी या सप्ताहात मिळणार आहे.

 

विशेष म्हणजे, स्टार्टअप्सच्या विश्वात २०२१ हे वर्ष ‘युनिकॉर्नचे वर्ष’ म्हणून ओळखले गेले आहे, ज्यात वर्षभरात चाळीसहून अधिक युनिकॉर्न्सची भर पडली आहे.

 

स्टार्टअप कंपन्यांच्या बाबतीत जागतिक नवनवीन उपक्रमांचे केंद्र म्हणून भारत उदयास येत आहे. आज भारतात स्टार्ट अप्स वेगाने वाढत असून क्षेत्रात तो तिसर्‍या क्रमांकावर आहे.उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागाने (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, DPIIT) आजपर्यंत ६१,००० पेक्षा जास्त स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे. देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात किमान एक तरी स्टार्टअप असून ६३३ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या ५५ उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशातल्या स्टार्टअप्सनी २०१६ पासून 6 लाखांहून अधिक नोकऱ्या (रोजगार) निर्माण केल्या आहेत. ४५% स्टार्टअप २-टियर आणि 3-टियर शहरांत असून त्यापैकी 45% स्टार्ट अप्स महिला उद्योजकांनी सुरु केले आहेत. स्टार्टअप्समध्ये जागतिक मूल्य साखळीद्वारे भारताच्या एकात्मतेला गती देण्याची आणि जागतिक प्रभाव निर्माण करण्याची क्षमता आहे.

 

या स्टार्टअप आणि नवोन्मेष उत्सवाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील प्रमुख स्टार्टअप्स, उद्योजक, गुंतवणूकदार, इनक्यूबेटर्स, निधी सहाय्य करणाऱ्या संस्था, बँका, धोरणकर्ते आणि इतर राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय भागधारकांना एकत्र आणून उद्योजकतेचा उत्सव साजरा करणे आणि नव उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे आहे. शिवाय, याद्वारे स्टार्टअप व्यवस्थेसाठी पोषक वातावरण करण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करणे, उद्योजक व्यवस्था वाढवण्यासाठीची क्षमता विकसित करणे; स्टार्टअप गुंतवणूकीसाठी जागतिक आणि देशांतर्गत भांडवलाला एकत्रितपणे गती देणे; नवनिर्मिती आणि उद्योजकतेसाठी तरुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे, स्टार्टअप्सना बाजारात प्रवेशाच्या संधी उपलब्ध करून देणे; आणि भारतातील उच्च-गुणवत्तेचे, उच्च-तंत्रज्ञान आणि काटकसरीच्या नवकल्पनांचे प्रदर्शन करणे ही उद्दिष्टेही समाविष्ट आहेत.

 

राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि भारत सरकारच्या विविध विभागांच्या सहभागाने, आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात स्टार्टअप व्यवस्थेच्या महत्त्वाच्या पैलूंवर संवादात्मक सत्रे, कार्यशाळा आणि संकल्पना आधारित सादरीकरण यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी पुढील संकेतस्थळावर संपर्क साधावा

https://www.startupindiainnovationweek.in


Tags: Department for the Promotion of Industry and Internal TradeInnovation WeekStartup Indiavडिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडनवोन्मेष सप्ताहस्टार्टअप इंडिया
Previous Post

जिल्हा पातळीवर आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर लक्ष देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

Next Post

सुट्ट्यांवर सुट्ट्या, सुट्ट्यांवर सुट्ट्या! उच्च न्यायालयाकडून आता सुट्ट्यांची दखल!

Next Post
high court mumbai

सुट्ट्यांवर सुट्ट्या, सुट्ट्यांवर सुट्ट्या! उच्च न्यायालयाकडून आता सुट्ट्यांची दखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!