मुक्तपीठ टीम
गेल्या काही महिन्यांपासून एसटी महमंडळाचे राज्य शासनात विलीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा न्यायालयीन लढा अद्याप सुरुच आहे. दुसरीकडे बससेवेचे कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील ओढाताण अजून सुरुच आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी स्टार बससेवेचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. आपली बस हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. मात्र, कर्मचारी संपावर गेल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शहरातील २५० पेक्षा जास्त बस ठप्प आहेत. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
कर्मचाऱ्यांचा संताप
- आपली बसचा मुख्य डेपो मोरभवन येथे आहे.
- सर्व कर्मचारी एकत्र आले.
- पगार न मिळाल्यामुळे कामावर जाण्यास ते तयार नाहीत.
- त्यामुळं शहर परिवहनची आपली बसची वाहतूक आता खोळंबली आहे.
- नेहमी दहा ते बारा तारखेपर्यंत पगार मिळत नाही.
- युनिटी सेक्युरिटी फोर्सला हे कंत्राट दिले आहे.
- बरेचदा पंधरा तारीख ओलांडून गेल्यावरही पगार मिळत नाही.
- नियम खूप कडक आहेत.
- मोबाईल वापरला जाऊ दिला जात नाही.
- घरी जायला उशीर होतो, असं महिला कर्मचारी सांगतात. पगार मिळतो.
- तोही फक्त आठ हजार.
- हे पैसेसुद्धा वेळेवर मिळत नाही.
- मुलांचे शिक्षण, इतर खर्च कसा भागवावा काही कळतं नाही.
हा संप नियमानुसार, कर्मचाऱ्यांचा दावा…
- आपली बसच्या कर्मचाऱ्यांना पगार दहा तारखेला मिळेल, असं लेखी देण्यात आलं आहे.
- परंतु, तेही मिळत नाहीत.
- गेल्या तीन-चार महिन्यांपासून कधी वीस तर कधी पंचवीस तारखेला पगार होतो.
- कर्मचाऱ्यांनी आधीच कळविले होते की, पगार झाला नाही, तर आपली बस सुरू करणार नाही.
- त्यामुळं हा संप नियमानुसार असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय.
- पगार झाला नसल्यानं बस उभ्या करण्यात आल्या.
- या संपामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत.
- खासगी वाहनचालकांनी अतोनात भाव वाढविले आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीला प्रवास करणे कठीण झाले आहे.