Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संपावरून पडळकर आक्रमकच, तर अनिल परबांचं संप मागे घेण्याचं आवाहन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gopichand Padalkar criticizes Mahavikas Aghadi government

मुक्तपीठ टीम

मुंबईतील आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही सहभागी झाले आहेत. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळाचे प्रतिनिधी, एसटी कर्मचारी प्रतिनिधी आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप योग्य तोडगा निघू शकलेला नसल्याने गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं असल्याची टीका केली आहे. त्यातच अनिल परब यांनी संप मागे घ्या चर्चा करू असे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहे.

 

काळ्या पायाचं हे सरकार

  • राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं आहे.
  • काळ्या पायाचं हे सरकार आहे.
  • अनेक संकटाच्या काळात या सरकारने काहीही मदत केली नाही.
  • सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या ऐकून घ्याव्या.
  • त्यांना काय देता येईल, काय देता येणार नाही याबाबतही चर्चा करावी.
  • अन्यथा हेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत.

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक

  • परिवहन खात्याचे सचिव हे परदेशात जातातच कसे?
  • गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे परिवहन सचिव परदेशात जातात.
    त्यांची चौकशी झाली पाहिजे.
  • ते मंत्रालयात आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासणार.
  • तसंच परिवहन विभागाचे MD शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार.
  • त्या पार्श्वभूमीवर उद्या प्रवीण दरेकर हे शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहेत.
  • यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी असतील.

 

संप मागे घ्या, चर्चा करू अनिल परबांचे आवाहन

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न चर्चेशिवाय सुटणार नाही, हे मी वारंवार सांगितलं आहे.
  • त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करु.
  • उच्च न्यायालयाचा योग्य तो निर्णय येईल.
  • येणारा निर्णय मान्य असेल.
  • मी वारंवार सांगतो की संप मागे घ्या, चर्चा करु आणि प्रश्न सोडवू.
  • भाजपनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे.
  • आम्ही उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करु.
  • निदर्शन करणं हा प्रत्येकाचा अधिकारी आहे.
  • मात्र, न्यायालयासमोर आत्मदहनाची धमकी देणं योग्य नाही.
  • न्याय योग्य पद्धतीनं मागायला हवा.

Tags: Anil ParabET Employeegopichand padalkarmumbaipravin darekarST Strikeअनिल परबएसटी कर्मचारीएसटी संपगोपीचंद पडळकरप्रवीण दरेकरमुंबईसदाभाऊ खोत
Previous Post

पेट्रोलच्या किंमतीविषयीचा ‘असा’ शोध फक्त दानवेच लावू शकतात!

Next Post

हार्दिक पंड्या अडचणीत आला! पण त्याचं कोटी-कोटींच्या घड्याळांचं कलेक्शन…पाहाल तर थक्क व्हाल!

Next Post
hardik

हार्दिक पंड्या अडचणीत आला! पण त्याचं कोटी-कोटींच्या घड्याळांचं कलेक्शन...पाहाल तर थक्क व्हाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!