Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य सरकारचा जीआर अमान्य…एसटी कर्मचाऱ्यांचा संपाची तीव्रता वाढतीच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
st bus

मुक्तपीठ टीम

गेल्या ११ दिवसांपासून राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा म्हणून राज्य सरकारने काढलेला जीआर कर्मचाऱ्यांनी फेटाळला आहे. परिवहन मंत्री यांनी न्यायालयीन आदेशाचा हवाला देत संप संपवण्याचे आवाहन केले असले तरी त्यांना कोणताही प्रतिसाद मिळण्याऐवजी संप अधिक तीव्र होताना दिसत आहे. राज्य शासनाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठीत करण्याचा जीआर काढला आहे. मात्र, यापूर्वीही फक्त आश्वासनांवर तडजोड केल्यानंतर पुढे काहीच झाले नाही, असा अनुभव असल्याने ते संपाच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहे.

 

सरकार काय करणार?

  • ‘न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे पुढची बैठक दहा दिवसांत म्हणजे १६ नोव्हेंबरला होईल.
  • त्यापूर्वी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचारी समजण्यात यावे, या संघटनांच्या मागणीविषयी सध्याच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत व सविस्तर टिप्पणी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून समितीने मागवली आहे.
  • उच्च न्यायालयाचा मनाई आदेश झुगारून संप सुरूच ठेवणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेविरोधात राज्य सरकारनं आक्रमक भूमिका घेतली आहे.
  • या संघटनेविरोधात राज्य सरकार अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

 

संपाची तीव्रता वाढतीच…

  • गेल्या आठवडाभरापासून राज्याभरात एसटी कामगारांचा संप सुरू आहे.
  • सुरुवातीला संपाला तेवढा प्रतिसाद नव्हता. पण आता अधिकाधिक एसटी डेपो बंद होत आहेत. त्यामुळे एकीकडे संपाची तीव्रता वाढत आहे, तर दुसरीकडे सामान्य प्रवाशांचे हाल सुरु झाले आहे.
  • त्यात संपावरील तोडगा म्हणून सरकारने खासगी वाहतूकदारांना प्रवाशी वाहतुकीसाठी दिलेली परवानगी ही रोगापेक्षा इलाज भयंकर अशी मानली जाते आहे.
  • भाडेलुटीसाठी ओळखले जाणारे खासगी वाहतूकदार आता अधिकच लुटतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

संप मागे घेण्यासाठी नोटीस

  • एसटी कामगारांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत.
  • ऐन दिवाळीत सुरू झालेला हा संप मागे घेतला जावा म्हणून न्यायालयाने कामगार संघटनांसाठी मनाई आदेश जारी केला होता.
  • मात्र, कामगार संघटनेनं हा आदेश धुडकावत संप सुरूच ठेवला.
  • त्या प्रकरणी न्यायालयानं कामगार नेते गुजर यांना नोटीसही बजावली आहे.
  • बुधवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे.
  • आता राज्य सरकार एसटी कामगार संघटनेविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

Tags: GRST StrikeST Workersstate govtएसटी कर्मचारीएसटी संपजीआरराज्य सरकार
Previous Post

महाराष्ट्रावरील महासंकटकाळात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंचे असामाजिक ‘ठुमके’

Next Post

आक्रमक मलिकांना रोखण्यासाठी कायद्याचा आधार, १०० कोटींचा खटला, आता अॅट्रोसिटीची तक्रार!

Next Post
wankhede against malik

आक्रमक मलिकांना रोखण्यासाठी कायद्याचा आधार, १०० कोटींचा खटला, आता अॅट्रोसिटीची तक्रार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!