Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

एसटी संपावर मंगळवारी न्यायालयात महत्वाची सुनावणी, काय घडणार?

February 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
ST strike hearing on Tuesday

मुक्तपीठ टीम

एसटी कर्मचारी संपावर उद्या सुनावणी

  • संपामुळे एसटीचं हजारो कोटींचं नुकसान
  • गेल्या ३ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
  • मात्र यामुळे एसटीच्या उत्पन्नाला १ हजार ६०० कोटींचं नुकसान सोसावं लागलं आहे. सोबतच खेडापाड्यातल्या प्रवाश्यांचेही मोठे हाल होत आहेत. संपावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने मंगळवारी (दि. २२ फेब्रुवारी २०२२) होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.

 

एसटीचं मोठं नुकसान

२८ ऑक्टोबर २०२१ पासून शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. परिणामी, एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. आगारात एसटी बाहेर काढण्याचा प्रयत्नही झाला मात्र एसटीवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बस आणि वडाप वाहतुकीला परवानगी देण्यात आली. संपामुळे नोव्हेंबर २०२१पर्यंत एसटीचे ४३९ कोटी रुपयांचे नुकसान झालं. हा आक़डा १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

 

सेवा सुरळीत करण्यासाठी एसटीचे प्रयत्न

एसटीच्या दररोजची प्रवासी संख्या ७ लाखाहून अधिक आहे. एसटीच्या दररोज १० हजारांहून अधिक फेऱ्या होतात. एसटीची एकूण कर्मचारी संख्य़ा ८२ हजार ४८९ इतकी आहे. २८ हजार ९३ कर्मचारी कामावर परतलेत. संपात अजूनही ५४ हजार कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या एसटीच्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करण्यासाठी महामंडळाने खासगी चालक, वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात १,६०० हून अधिक चालक, खासगी वाहकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुन्हा कर्तव्यावर आलेल्या एसटी चालक, वाहकांकडून सेवा दिली जात आहे. त्याचबरोबरच खासगी चालकांकडून एसटी चालवली जात आहे. आता एका खासगी संस्थेकडून वाहकही नियुक्त केले जाणार आहेत. हे वाहक एसटी बसमध्ये सेवा न देता बस आगार, थांबे येथे उभे राहून प्रवाशांना तिकीट देतील. लवकरच त्यांची नियुक्ती केली जाईल.”
एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरुच

 

एसटीच्या निलंबित कर्मचाऱ्य़ांची संख्या ११ हजार २४ वर पोहोचली आहे. १० हजार ३६२ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच आतापर्यंत ९ हजार २५१ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.


Tags: MaharashtraST Strikeएसटी संप
Previous Post

भाजपाच्या माजी खासदार उमा भारतींचं दु:ख: सरकार मी बनवते, चालवतं दुसरंच कुणी!

Next Post

मनसे दणक्यात साजरा करणार मराठी भाषा दिन! राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश!!

Next Post
Raj thackerays order to celebrate Marathi Language Day With pride

मनसे दणक्यात साजरा करणार मराठी भाषा दिन! राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!