Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसे दणक्यात साजरा करणार मराठी भाषा दिन! राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj thackerays order to celebrate Marathi Language Day With pride

मुक्तपीठ टीम

“मराठी भाषा गौरव दिवस दणक्यात साजरा करा” राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

 

२७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. १९ फेब्रुवारीला त्यांनी पत्र लिहून कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं आहे. आपली भाषा आहे, म्हणून आपण आहोत आणि आपली ओळख आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक हो,

सस्नेह जय महाराष्ट्र !
२७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. गौरव दिवस पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता. परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्धत आपण, आपल्या पक्षानं सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली. हा आपल्या भाषेचा “गौरव” दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा.

 

आपली भाषा आहे, म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेने कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा हा गौरव दिवस आहे. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी द्रष्टी माणसे, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतिकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागे ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावे घ्यायची? या सर्वाची भाषा आणि अर्थात सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठीच! अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमाने व्हायला हवा.

 

यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पाहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा.

 

संपूर्ण राज्यात या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा !

 

आपला नम्र,
राज ठाकरे


Tags: manasemarathi language dayRaj Thackerayमनसेमराठी भाषा गौरव दिवसमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाराज ठाकरे
Previous Post

एसटी संपावर मंगळवारी न्यायालयात महत्वाची सुनावणी, काय घडणार?

Next Post

जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्तानं महिमा मराठीचा…

Next Post
Proff Hari narke On the occasion of World marathi Language Day

जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्तानं महिमा मराठीचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!