Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वकील सदावर्ते एकटेच पोलीस कोठडीत! १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
st woker csmt

मुक्तपीठ टीम

गुणरत्न सदावर्ते यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ एप्रिल २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर १०९ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना जामीन नाही. गरुवारी उच्च न्यायालयाने २२ तारखेपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिल्यानंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आक्रमक आंदोलन केले. या संपूर्ण घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उठली. यानंतर आंदोलकांना भडकवणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांवरच आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला. यानंतर आझाद मैदानावरून पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर जमावानं थेट सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला.

 

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक

  • शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनप्रकरणी जमावाला भडकावल्याप्रकरणी आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे.
  • त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखाल करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.
  • या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंदोलकांना शांतता राखून सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे.
  • पोलिसांनी आत्तापर्यंत सिल्व्हर ओकवरील आंदोलनप्रकरणी पोलिसांनी शंभरापेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ‘दूध का दूध, पानी का पानी करू’ असं बजावून सांगितलं आहे.

 

कर्मचारी सीएसएमटी स्थानकात ठिय्या मांडून बसले!

  • सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर सर्व एसटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदानावर पोहोचले होते.
  • रात्रीपर्यंत आंदोलक तिथेच थांबल्यानंतर या आंदोलकांना मध्यरात्री उशीरा आझाद मैदानातून देखील हटवण्यात आले.
  • या कारवाईनंतर हे सर्व आंदोलक जवळच्याच सीएसएमटी स्थानकात ठिय्या मांडून बसले आहेत.
  • आपल्याला पोलिसांनी बळजबरीने आझाद मैदानातून हटवल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे.

Tags: Azad MaidanCSMT StationST StrikeST Workerअॅड. गुणरत्न सदावर्तेआझाद मैदानएसटी कर्मचारीसीएसएसटी स्थानक
Previous Post

भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

Next Post

“बलात्कार गंभीर गुन्हा, तडजोडीनं खटला संपवता येत नाही!” – उच्च न्यायालय

Next Post
Delhi High Court

"बलात्कार गंभीर गुन्हा, तडजोडीनं खटला संपवता येत नाही!" - उच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!