मुक्तपीठ टीम
जम्मू आणि काश्मीरमधून रोजच हिंसाचाराच्या बातम्या येत असतात. आपले बहाद्दर जवान अधिकारी प्राण पणाला लावून दहशतवाद्यांना अद्दल घडवतात. पण त्याच काश्मीरमधील श्रीनगरविषयीची ही बातमी अभिमान वाढवणारी.
युनेस्कोच्या ‘क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क’च्या यादीत जम्मू आणि काश्मीरची ग्रीष्मकालीन राजधानी असलेल्या श्रीनगरचा समावेश झाला आहे. श्रीनगर हे जगातील ४९ शहरांपैकी एक आहे ज्याचा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (यूसीसीएन) मध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत आधीच २४६ शहरे आहेत.
युनेस्कोने विकास, ज्ञान आणि चांगल्या पद्धतींच्या देवाणघेवाणीच्या केंद्रस्थानी संस्कृती आणि रचनात्मक ठेवण्याची त्यांची बांधिलकी ओळखल्यानंतर या यादीत ४९ शहरांचा समावेश करण्यात आला. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये हस्तकला आणि लोककला श्रेणीमध्ये सामील झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरचे अभिनंदन केले आहे.
Congratulations Srinagar !
Srinagar has been added to UNESCO’s creative Cities Network as a creative city for crafts and folk art. https://t.co/iHpprrZQ9I@PMOIndia @narendramodi_in @MEAIndia @IndianDiplomacy @VishalVSharma7 @MinOfCultureGoI @JandKTourism @manojsinha_ https://t.co/AIK4eWKeP8— India at UNESCO (@IndiaatUNESCO) November 8, 2021
युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कविषयीचे महत्त्वाचे मुद्दे
- युनेस्कोच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आता ९० देशांमधील अशा शहरांची संख्या २९५ आहे.
- येथे संस्कृती, रचनात्मकता, हस्तकला आणि लोककला, साहित्य, संगीत इत्यादींमध्ये शाश्वत शहरी विकासासाठी गुंतवणूक केली जाते.
- भारतीय राष्ट्रीय सहकार्य आयोगाने (आयएनसीसीयू) श्रीनगरसह ग्वाल्हेरचेही नाव या यादीत समाविष्ट करण्यासाठी पाठवले होते.
श्रीनगरचे महापौर जुनैद अझीम मट्टू यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रीनगरचा प्रतिष्ठेच्या यादीत समावेश झाल्याची माहिती दिली. या यादीत मुंबई आणि हैदराबादचा समावेश ऑक्टोबर २०१९ मध्ये करण्यात आला होता.