मुक्तपीठ टीम
कोरोनाविरोधातील लढ्यात लस हे महत्याचे शस्त्र आहे. मात्र, भारताची लोकसंख्या लक्षात घेता भारत बायोटेकची को-वॅक्सिन आणि सीरमच्या कोविशिल्ड या दोन लसींचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेत सातत्याने अडथळे येत आहेत. आज कामगार दिनी भारताचा जुना दोस्त असणाऱ्या रशियाकडून स्पुटनिक – व्ही लसींचा पहिली खेप भारतात येत आहे. ती काही लाखांचीच असली तरी या महिन्यात मोठा साठा येण्याची शक्यताय. त्यामुळे काही प्रमाणात तरी भारतातील लस टंचाईवर मात करता येईल.
रशियाच्या आरडीआयएफचे प्रमुख किरील दिमित्रिक यांनी म्हटले होते की, “१ मे रोजी स्पुटनिक-व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल होईल. तसेच ही लस भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या महामारीतून बाहेर काढण्यास मदत करेल अशी आशा व्यक्त करतो”.
रशियाची स्पुटनिक, खूपच सुरक्षित!
- स्पुटनिक व्हीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर ही लस ९१.६ टक्के सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आणि कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत.
- द लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीच्या अंतरिम विश्लेषणात असा दावा करण्यात आला आहे.
- तब्बल २०,००० लोकांवर हे संशोधन करण्यात आले होते.
- भारतात व्यतिरिक्त स्पुटनिक -व्ही लसीला अन्य ६० देशांमध्ये आप्तकालीन मंजूरी देण्यात आली आहे.
- यानंतर दोन महिन्यांनी एप्रिलमध्ये भारत सरकारने स्पुटनिक-व्ही लसीच्या भारतातील आप्तकालीन वापरास मंजूरी दिली.
किती असेल स्पुटनिक-व्हीची किंमत?
- अद्याप या लसीची अधिकृत किंमत जाहीर झालेली नाही.
- भारतात स्पुटनिक व्ही लसीसाठी १० डॉलर म्हणजेच अंदाजे ७५० रुपये मोजावे लागतील असा अंदाज आहे.
- भारतात सध्या दोन लसी उपलब्ध आहेत. त्या केंद्र सरकार २०० रुपात खरेदी करत आहे.