Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

क्रीडा मंत्रालयाची ऑलिम्पिकसाठी ‘टॉप्स’ योजना, दहा खेळाडूंचा समावेश

January 13, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Olympic

मुक्तपीठ टीम

घोडेस्वार फवाद मिर्जा, गोल्फपटू अनिर्बान लाहिरी, अदिती अशोक आणि दीक्षा डागर, अल्पाइन स्कीईंगपटू मोहम्मद अरिफ खान यांच्यासह १० क्रीडापटूंचा समावेश युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने मिशन आलिम्पिक सेल (एमओसी)मध्ये करण्यात आला आहे. या सर्व खेळाडूंना ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम’- टॉप्सअंतर्गत आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.

 

त्याचबरोबर या पाचही खेळाडूंचा कोअर गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर गोल्फपटू शुभंकर शर्मा आणि त्वेसा मलिक आणि ज्युडोपटू यश घंगस, उन्नती शर्मा आणि लिंथोई चनमबाम यांचा समावेश ‘डेव्हलपमेंट’ समूहामध्ये करण्यात आला आहे. यामुळे आता टॉप्समध्ये समावेश करण्यात आलेल्या क्रीडापटूंची संख्या ३०१ झाली आहे. त्यापैकी १०७ क्रीडापटू कोअर ग्रुपमध्ये आहेत.

 

प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी (एसीटीसी)वार्षिक दैनंदिनी अंतर्गत मंत्रालयाच्यावतीने प्रामुख्याने वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंना मदत करीत असते. टॉप्स एसीटीसी अंतर्गत समावेश झाला नसलेल्या क्षेत्रांमध्ये खेळाडूंनाही काही प्रमाणात त्यांच्या गरजेनुसार पाठिंबा देत आहे. ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची तयारी करताना खेळाडूंना अनपेक्षितपणे लागणारी मदत केली जात आहे.

 

जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग इथला स्कीईंगपटू मोहम्मद अरिफ खान हा पुढच्या महिन्यात बीजिंग येथे होणा-या हिवाळी ऑलिम्पिक २०२२ साठी पात्र ठरलेला पहिला भारतीय अल्पाइन स्कीईंगपटू आहे. एमओसीने १७.४६ लाख रूपये मंजूर केले आहेत. या निधीचा विनियोग युरोपमध्ये पाच आठवड्याचे प्रशिक्षण आणि उपकरणांच्या खरेदीसाठी करण्यात येणार आहे.

 

घोडेस्वार फवाद मिर्जा याने जकार्ता येथे २०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये इव्हेंटिंग- वैयक्तिक रौप्य पदक जिंकले होते आणि गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत २३ वे स्थान मिळवले होते. जर्मनीमध्ये वास्तव्य करणारा फवाद मिर्जा सध्या जागतिक क्रमवारीमध्ये ८७व्या स्थानावर आहे. या २९ वर्षीय खेळाडूने सप्टेंबरमध्ये सोपोट येथे आणि नोव्हेंबरमध्ये प्रॅटोनी डेल विवॅरो येथे दोन टॉप-१० फिनीश नोंदवले आहेत.

 

बेंगलुरूची २३ वर्षीय गोल्फपटू अदिती अशोक हिने पदके जिंकून आणि चमकदार कामगिरीने टोकियो २०२० स्पर्धेमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. तर हरियाणातल्या झज्जर इथली २१ वर्षीय डावखुरी दीक्षा डागरने २०१७ च्या उन्हाळी बधिरांच्या ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकून लक्ष वेधले. तिने गेल्या वर्षी ऑलिम्पिक खेळांमध्ये ५०वे स्थान मिळवले आहे.

 

किशोरवयीन ज्युडोपटू यश घंगास (१००किलो गट),लिंथोई चनामबाम (५७किला गट), आणि उन्नती शर्मा (६३किलो गट) यांनी गेल्या महिन्यात लेबनान, बेरूत येथे झालेल्या आशिया- ओशनिया कनिष्ठ विजेतेपदाच्या क्रीडा स्पर्धेत रजत पदक जिंकले आहे. यश घणघस हरियाणातल्या पानिपतचा आहे तर लिंथोई मणिपूरचा आहे आणि उन्नती उत्तराखंडची आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsMinistry of SportsMinistry of Youth Welfare and SportsMission Olympic CellmuktpeethOlympic 'Tops' SchemeSports fieldऑलिम्पिक ‘टॉप्स’ योजनाक्रिडा क्षेत्रक्रीडा मंत्रालयचांगल्या बातम्यामिशन आलिम्पिक सेलमुक्तपीठयुवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय
Previous Post

डीआरडीओच्या ‘मेड इन इंडिया’ रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी

Next Post

सॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोन सिरीज ८ फेब्रुवारीला लाँच होण्याची शक्यता!

Next Post
Samsung Galaxy S22

सॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोन सिरीज ८ फेब्रुवारीला लाँच होण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!