Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

September 3, 2022
in सरकारी बातम्या
0
Sport Min Girish Mahajan-1

मुक्तपीठ टीम

राज्यात १७ वर्षाखालील  फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२ चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य  आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असून ही स्पर्धा भारतीय मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२ च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, १७ वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक २०२२ या स्पर्धेत भारत, चीन, जपान, मोरोक्को, नायजेरिया, टांझानिया, कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, ब्राझील, चिली, कोलंबिया, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन हे १६ देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील एकूण पाच सामने राज्यात होणार आहेत. नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियम आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या मैदानावर हे सामने होणार आहेत.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांशी संबंधित अधिकारी यांना मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक विभागाच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असल्याने देशातील अतिमहत्त्वाचे लोक हे सामने पाहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्टेडियम, वाहतूक, निवास, सुशोभीकरण, अग्निशमन व्यवस्था व रस्त्याची दुरुस्ती, वैद्यकीय व्यवस्था, स्पर्धा प्रसिद्धी, विविध समित्यांचे गठन आदी विषयांचा आढावा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी घेतला.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, स्पर्धा केवळ सहभागी खेळाडूंनाच फायद्याची नाही तर संबंधित यजमान राष्ट्रांसाठीही खूप मोलाची ठरणार आहे. या महिला विश्वचषकाने तळागाळातील अधिक तरुण मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहित करून लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याबरोबरच महिला फुटबॉलचे व्यावसायिक मूल्य वाढवले ​​आहे. नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकेतील ठाणे व रायगड जिल्ह्यातील, शालेय विद्यार्थ्यांना हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहता येईल, असे नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी आयोजन समितीला दिल्या.

भारत २०२२ च्या स्थानिक आयोजन समितीने (LOC) अशाप्रकारे आगामी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन घेतला आहे, जेणेकरून देशाला अभिमान आणि गौरव मिळेल.  पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हा विकासाचा एक केंद्रबिंदू असताना, देशातील महिला फुटबॉलचा लँडस्केप बदलण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

अशाप्रकारे सकारात्मक वारसा मागे ठेवण्यासाठी विविध उद्दिष्टे ठेवली गेली आहेत.  फुटबॉल नेतृत्व आणि निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, अधिक मुलींना भारतात फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित करणे, लहानपणापासून समान खेळाची संकल्पना सामान्य करून सर्व समावेशक सहभागासाठी प्रयत्न करणे, भारतातील महिलांसाठी फुटबॉलचा दर्जा सुधारण्याची संधी निर्माण करणे, महिलांच्या खेळाचे व्यावसायिक मूल्य सुधारणे, प्रत्येक उद्दिष्टाची काळजी घेऊन स्थानिक आयोजन समितीने सर्व आघाड्यांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.

या आढावा बैठकीस क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नवीन येणारे आयुक्त सुहास दिवसे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, फिफाचे प्रतिनिधी रोमा खान, क्रीडा विभाग, नवी मुंबई पोलीस, महानगरपालिकेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Tags: FIFA Women's Football World CupMaharashtranavi mumbaiSports Minister Girish Mahajanक्रीडा मंत्री गिरीश महाजनफिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा
Previous Post

“अद्भुत अनुभूती!” गणरायांच्या दर्शनानंतर महावाणिज्य दूतांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

Next Post

नासाचे मिशन आर्टेमिस-1 प्रक्षेपणासाठी सज्ज! पुन्हा चंद्रावर मानव!!

Next Post
NASA Mission Artemis-1

नासाचे मिशन आर्टेमिस-1 प्रक्षेपणासाठी सज्ज! पुन्हा चंद्रावर मानव!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!