क्रीडा थोडक्यात: १) भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यामुळेच भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आली नव्हती. पण आता तिसऱ्या आणि कसोटी सामन्यात तो खेळणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. उमेशची फिटनेस टेस्ट अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर घेण्यात आली होती. या फिटनेस टेस्टमध्ये तो पास झाला आहे. २) आयपीएलच्यास १४ व्या हंगामातील खेळाडूंचा नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावानंतर हैदराबाद संघात एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. लिलावामध्ये स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीवर टीका होत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार आणि माजी मंत्री दानम नागेंद्र यांनी संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर फिक्सिंगचा आरोपही केला आहे. तसेच वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणीही दानम नागेंद्र यांनी केली आहे. ३) सहा वेळा विश्वविजेत्या ३७ वर्षीय मेरीने गतवर्षी घरीच सराव केला. त्यानंतर डेंग्यूमुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा लाभलेल्या जॉर्डन येथील आशियाई स्पर्धेला तिला मुकावे लागले. परंतु आजारपणातून सावरल्यावर जानेवारीत मेरी बेंगळूरुच्या राष्ट्रीय अकादमीत सामील झाली असून १ ते ७ मार्च या कालावधीत कॅसलॉन (स्पेन) येथे होणाऱ्या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. त्यापूर्वी “कोरोना विषाणूचे भय किती काळ बाळगणार, असा सवाल मेरी कोमने केला आहे.