Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे-नगरमध्ये आयटी मोहीम, २४३ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख तंबाखू विक्रीमागे कोण?

February 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
Tobacco IT raid

मुक्तपीठ टीम

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर आणि पुण्यातील एका कंपनीच्या, महाराष्ट्रातील ३४ ठिकाणच्या विविध कार्यालयांवर शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली आहे. या मोहिमेत २४३ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख तंबाखू विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. या बेकायदा विक्री व्यवहारात नेमके कोण सहभागी आहेत, त्याचाही शोध घेतला जात आहे. आतापर्यंत या मोहिमेत ३३५ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळले आहे.

 

या कंपन्या, तंबाखू आणि त्याच्याशी संबधित उत्पादनांची निर्मिती, पॅकेजिंग आणि विक्री तसेच ऊर्जावितरण, एफएमसीजी आणि बांधकाम व्यवसायांशी संबधित आहेत.  या शोध मोहिमेत, हस्तलिखित आणि कॉम्युटर वरील एक्सेल शीट्स मध्ये असलेल्या हिशेबांमध्ये २४३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख तंबाखू विक्री केल्याची माहिती आढळली. त्याशिवाय, काही तंबाखू उत्पादनांशी संबधित व्यवहारांची चौकशी करतांना, आणखी सुमारे ४० कोटी उत्पादनांची बेहिशेबी विक्री केल्याचेही आढळले.

 

हे व्यावसायिक, बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवहारांमध्ये नोंदणीकृत किमतीपेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारत आणि देत असल्याचेही लक्षात आले आहे. यासंदर्भात १८ कोटी रुपयांचे रोखीचे व्यवहार झाल्याचे पुरावे आढळले आहेत. प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ५०-सी चे उल्लंघन केल्याप्रकरणी, २३ कोटी रुपयेही आढळले आहेत.

 

या शोध मोहिमेदरम्यान बांधकाम खरेदी विक्रीच्या बेहिशेबी व्यवहारांमध्ये ९ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे या व्यावसायिकाने मान्य केले. एक कोटी रुपये इतकी बेहिशेबी रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत, ३३५ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळले आहे. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.

 


Tags: ahmednagarIT departmentpuneSangameshwarअहमदनगरआयकर धाडीआयकर मोहीमपुणेसंगमेश्वर
Previous Post

क्रीडा थोडक्यात: १) भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यामुळेच भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आली नव्हती. पण आता तिसऱ्या आणि कसोटी सामन्यात तो खेळणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. उमेशची फिटनेस टेस्ट अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर घेण्यात आली होती. या फिटनेस टेस्टमध्ये तो पास झाला आहे. २) आयपीएलच्यास १४ व्या हंगामातील खेळाडूंचा नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावानंतर हैदराबाद संघात एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. लिलावामध्ये स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीवर टीका होत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार आणि माजी मंत्री दानम नागेंद्र यांनी संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर फिक्सिंगचा आरोपही केला आहे. तसेच वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणीही दानम नागेंद्र यांनी केली आहे. ३) सहा वेळा विश्वविजेत्या ३७ वर्षीय मेरीने गतवर्षी घरीच सराव केला. त्यानंतर डेंग्यूमुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा लाभलेल्या जॉर्डन येथील आशियाई स्पर्धेला तिला मुकावे लागले. परंतु आजारपणातून सावरल्यावर जानेवारीत मेरी बेंगळूरुच्या राष्ट्रीय अकादमीत सामील झाली असून १ ते ७ मार्च या कालावधीत कॅसलॉन (स्पेन) येथे होणाऱ्या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. त्यापूर्वी “कोरोना विषाणूचे भय किती काळ बाळगणार, असा सवाल मेरी कोमने केला आहे.

Next Post

“महाराष्ट्रातील नवा कोरोना स्ट्रेन अतिघातक असण्याची शक्यता!”

Next Post
Dr Randeep Guleria AIMS

"महाराष्ट्रातील नवा कोरोना स्ट्रेन अतिघातक असण्याची शक्यता!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!