Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी, खास आरोग्य विमा योजनेसाठी प्रयत्न

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
senior citizens

मुक्तपीठ टीम

राज्यातील ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आरोग्य योजना तयार करण्यावर सामाजिक न्याय खाते काम करत आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच त्यांना ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू केली जाईल. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

 

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल, एन यु एच एमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, डी एम ई आरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवाले, जे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिव, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

 

ज्येष्ठ नागरिकांकरिता आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांबाबत शिफारशी करणे, या योजनेअंतर्गत आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणेबाबतच्या कार्यपद्धतीबाबत शिफारस करणे, या योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधीत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त होण्याबाबत व त्यात आजार आढळल्यास त्याचे निदान करणेबाबत तसेच आरोग्य विभागाच्या व इतर योजनेमध्ये अभिसरण करण्याची कार्यपद्धतीबाबत शिफारस करणे, इत्यादी बाबींसह शरद् शतम योजनेच्या एकूणच कार्यपद्धतीला निश्चित करण्यासाठी शिफारशी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी या समितीवर नेमण्यात आली असून, समितीने ठराविक वेळेत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Dhananjay MundeMaharashtrasenior citizensखास आरोग्य विमा योजनाज्येष्ठ नागरिकधनंजय मुंडे
Previous Post

तुडूंब भरली मराठवाड्यातीलही धरणं! पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा साठा!

Next Post

इंडियन ऑईलमध्ये ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंटच्या ५१३ जागांसाठी भरती

Next Post
indian oil

इंडियन ऑईलमध्ये ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंटच्या ५१३ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!