मुक्तपीठ टीम
जर हिवाळ्यात पर्यटनासाठी जायचं असेल तर चला मग राजस्थानला. राजस्थान हे भारतातील एक असे क्षेत्र आहे, जे नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिले आहे. आयआरसीटीसीने राजस्थान भेटीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक जबरदस्त टूर पॅकेज ऑफर केलं आहे.
या राजस्थान टूर पॅकेजला रॉयल राजस्थान असे नाव दिले आहे. या टूर पॅकेजमध्ये राजस्थानमधील बिकानेर, जयपूर, जैसलमेर आणि जोधपूरसारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय, या विशेष टूर पॅकेजमध्ये अनेक सुविधा देखील मिळतील.
कोण-कोणत्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांना देता येणार भेट
- राजस्थानचा हा विशेष दौरा भोपाळ रेल्वे स्टेशनपासून १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३५ वाजता सुरू होईल.
- ट्रेनमध्ये रात्रभर प्रवास केल्यानंतर, प्रवासी दुसऱ्या दिवशी गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरला पोहोचतील.
- जयपूरमध्ये पर्यटन स्थळे पाहताना हवा महल आणि जंतर-मंतरला भेट दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी प्रवासी जोधपूरकडे रवाना होतील.
- जोधपूरमधील मेहरानगढ किल्ला आणि उमेद भवन संग्रहालयाला भेट दिल्यानंतर प्रवासी जैसलमेरला रवाना होतील.
- जैसलमेरमधील जैसलमेर फोर्ट पटवन की हवेली सारख्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी बिकानेरला जातील.
- बिकानेरमधील प्रवासी जुनागड किल्ला आणि देशकोन मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देऊन जयपूरला परत येतील.
- जयपूरमधील आमेर किल्ला आणि जलमहालला भेट दिल्यानंतर परत भोपाळला परत ट्रेन निघेल.
कोणत्या सुविधा उपलब्ध असणार
- या दौऱ्यात प्रवाशांना सेकंड एसी कोचमध्ये प्रवास करता येईल.
- या व्यतिरिक्त, ५ रात्रीच्या मुक्कामासाठी डिलक्स हॉटेल आणि विश्रांती आणि एका रात्रीच्या विश्रांतीसाठी तंबू असतील.
- प्रत्येक ठिकाणच्या दर्शनासाठी एसी बस किंवा टेम्पो सुविधा असेल.
- यावेळी ८ दिवस नाश्ता आणि रात्री जेवणाची देखील व्यवस्था असेल.
- आयआरसीटीसीच्या रॉयल राजस्थान टूरसाठी २६७०० रुपये खर्च करावे लागतील.