Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंतराळातील तरंगती पिझ्झा पार्टी…स्पेस स्टेशनमधील व्हिडीओ जबरदस्त व्हायरल!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
pizza party

मुक्तपीठ टीम

स्पेस स्टेशनमध्ये पिझ्झा पार्टी. अंतराळवीरांसाठी, अंतराळवीरांनी आयोजित केलेली. अंतराळात प्रवास करणं खूपच रोमांचक असते आणि त्यांची ही स्पेस पिझ्झा पार्टीही तशीच रोमांचक. व्हिडीओ पाहिला तर पिझ्झा दिसतात. पण ते उभे पकडूनही टॉपिंग्स मात्र पडत नाही. काटे चमचे अगदी टाचेवर ऐटीत उभे. कसलाही आधार न घेता. अंतराळवीरांच्या या पिझ्झा पार्टीमागे उद्देश होता तो सर्वांनाच मनासारखं जगण्याची संधी देण्याचा. व्हिडीओवरून तो धमाल उद्देश साध्य झाल्याचं दिसतंय.

pizza party

अंतराळात वावरताना कठोर परिश्रम करावे लागतात. त्याचवेळी आपल्या आवडत्या वस्तू खाण्या-पिण्यावर बंधनंही असतात. परंतु अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पिझ्झा पार्टी करत असलेल्या अंतराळवीरांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात अंतराळ स्थानकात पिझ्झा खाऊन अंतराळवीर मज्जा करताना दिसत आहेत. पृथ्वीवर पिझ्झा पार्टी करणे तसं पाश्चात्य देशांमध्येच नाही आता आपल्या शहरी भागांमध्येही नेहमीचं झालं आहे, परंतु स्पेस स्टेशनमध्ये पिझ्झा पार्टी ही एक विलक्षण गोष्ट आहे आणि ज्याने हा व्हायरल व्हिडीओ पाहिला ते त्यातील गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे असणारे दृश्य पाहून आश्चर्यचकितच झाले.

 

अशी झाली तरंगती पिझ्झा पार्टी!

  • अंतराळवीर थॉमस पेस्केटने अंतराळ स्थानकात पिझ्झा पार्टीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.
  • एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये सहा अंतराळवीरांचा एक गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) ‘फ्लोटिंग पिझ्झा पार्टी’चा आनंद घेताना दिसत आहे.
  • व्हिडीओमध्ये तो पिझ्झामधील अन्न पदार्थ एकत्र करत आणि हवेत तरंगत पिझ्झा बनवतानाही दिसत आहे.
  • अंतराळवीर थॉमस पेस्केटने व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले, “मित्रांसोबत फ्लोटिंग पिझ्झा नाईट, पृथ्वीवरील शनिवार सारखे वाटते. चांगले शेफ कधीही त्याचे रहस्य उघड करत नाहीत, परंतु मी एक व्हिडिओ बनवला आहे तो पाहून तुम्ही ठरवू शकता.”

pizza party

अंतराळातील पिझ्झा पार्टी जबरदस्त व्हायरल

  • अंतराळातील पिझ्झा पार्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
  • आतापर्यंत हा व्हिडीओ ७०२,८१९ वेळा पाहिला गेला आहे.
  • या व्हिडीओला १,३७,९७७ लाईक्स मिळाले आहेत.
  • अंतराळातील पिझ्झा पार्टीचे हे आश्चर्यकारक दृश्य पाहून लोकही आश्चर्यचकित आहेत.
  • एका युजरची प्रतिक्रिया: “स्पेस पिझ्झा छान आहे. अंतराळात पिझ्झा बनवणे हे एक आव्हान आहे. पिझ्झा बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहून आनंद झाला.”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: floating Pizza partyISSspace station Pizza partyफ्लोटिंग पिझ्झा पार्टी
Previous Post

सोमवारची कमी रुग्णसंख्या! ३ हजार ७४१ नवे रुग्ण, ४ हजार ६९६ घरी परतले! 

Next Post

गोकुळाष्टमी ऑनलाइन, शाळेची भन्नाट शक्कल, मुलांचा उत्स्फूर्त सहभाग!

Next Post
gokulashtami

गोकुळाष्टमी ऑनलाइन, शाळेची भन्नाट शक्कल, मुलांचा उत्स्फूर्त सहभाग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!