Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना सांगितला राजधर्म!

राजकारणापलिकडे जाऊन कोरोनाचा भारतीय म्हणून सामना हाच राजधर्म!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
soniya gandhi & narendra modi

मुक्तपीठ टीम

देशातील कोरोना महामारीची भीषणता वाढत चाललेली असतानाच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर भेदभावाचे आरोप होत आहेत. उपचारांच्या अभावामुळे लोकांचे बळी जात असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमधील निवडणूक प्रचारात गुंतले असल्यामुळे वाढती टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली आहे. काँग्रेस कार्य समितीची सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी मोदींना राजधर्म सांगितला.

देशभरात कोरोनाचं सावट वाढलं असून राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक बोलावून त्यात देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका केली आहे. कोरोना महामारीला वर्ष झाल्यानंतरही सरकार गाफील असल्याचे सांगून सोनिया गांधी यांनी लसीकरणाची वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत करण्याची मागणीही केली आहे.

 

राजकारणापलिकडे जाऊन कोरोनाचा भारतीय म्हणून सामना हाच राजधर्म!

  • कोरोना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काँग्रेसने कायम घेतली आहे.
  • भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे.
  • कोरोनाच्या आव्हानाचा राजकारणापलीकडे जाऊन राजकीय प्रतिस्पर्धेऐवजी एक भारतीय म्हणून सामना करणे हाच खरा राजधर्म असेल, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

आपल्याच देशात हजारो लोक लस मिळत नसल्याने मरत असून दुसऱ्या देशांना मदत करून आपण किती उदार आहोत, हे दाखवण्याचा देशाला कसा फायदा होणार, असा सवालही सोनिया गांधींनी केला.

 

राहुल गांधींची टीका

  • कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीत मोदी सरकारला लक्ष्य केले.
  • कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारकडे कोणतीही रणनीती नाही.
  • ना लसीकरणाची ना ऑक्सिजन पुरवठ्याची, असे राहुल गांधी म्हणाले.

 

या आधी नरेंद्र मोदींना कुणी सांगितला होता राजधर्म? वाचा:

अटलबिहारी वाजपेयींनी सांगितला होता नरेंद्र मोदींना ‘राजधर्म’!


Tags: PM Narendra modiRahul gandiकाँग्रेस कार्यकारी समितीकोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदीराहुल गांधीसोनिया गांधी
Previous Post

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

अटलबिहारी वाजपेयींनी सांगितला होता नरेंद्र मोदींना ‘राजधर्म’!

Next Post
Atalbihari Vajpayee narednra modi

अटलबिहारी वाजपेयींनी सांगितला होता नरेंद्र मोदींना 'राजधर्म'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!