मुक्तपीठ टीम
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचलनालय (ईडी)कडून चौकशी करण्यात आली. सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात १२ वाजता हजर झाल्या आणि जवळपास अडीच तास ही चौकशी चालली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभरात जोरदार आंदोलनं करणात आली. महाराष्ट्रासह देशभर आज जोरदार आंदोलनं करण्यात आली. याआधी जूनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही याच प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. त्यावेळी काँग्रेसनेही याला विरोध केला होता.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या विरोधात आज जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. याठिकाणी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसले.आहे. या चौकशीच्या विरोधात कर्नाटक काँग्रेसने देखील आज बंगळुरूमध्ये आंदोलन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात आलं. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, सोलापुरात प्रणिती शिंदे, साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं गेलं. नागपूर, ठाणे, भिवंडीसह राज्यातील अनेक भागातही आंदोलनं झाली.
सोनिया गांधींविरोधात ईडीच्या चौकशीवरून काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या देशव्यापी निषेधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पी चिदंबरम, अजय माकन आणि इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर नेत्यांना दिल्ली पोलिसांनी विरोध केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोनियांना बोलवण्याची गरज नव्हती, ते फक्त त्यांना त्रास देत आहे, असे ते म्हणाले. शिवकुमार म्हणाले की, भाजपाला काँग्रेस नेत्यांना मानसिक त्रास द्यायचा आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी पक्ष किती ताकदवान आहेत हे दाखवण्याचे प्रयत्न करत आहे. महागाईचा मुद्दा आम्ही संसदेत मांडला पण ते चर्चेला तयार नाहीत. आता आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित करत आहोत.
हे ही वाचा:
सोनिया आणि राहुल गांधी यांच्यामागे ईडी लावणारे ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?