Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोनिया गांधी यांनी केले डॉ. नितीन राऊत यांच्या ‘मिशन ऑक्सिजन’चे कौतुक

May 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
sonia gandhi-nitin raut

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीच्या काळात जाणवणाऱ्या भीषण ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राबविलेल्या ‘मिशन ऑक्सिजन’या मोहीमेचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे. राज्यात तीन टप्प्यात हे मिशन राबविले जात असून तीनही टप्प्यानंतर राज्याला दररोज २०७० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होणार असून यामुळे हजारो लोकांचा जीव वाचवायला मदत होणार आहे.

 

कोरोना महामारीच्या काळात उर्जा विभागाने व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाबद्दलची माहिती डॉ. राऊत यांनी सोनिया गांधी यांना पाठविली होती. सोनिया गांधी यांनी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात या संकटाच्या काळात राज्यातील विविध रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या कामाचे कौतुक २१ मे रोजी पाठविलेल्या पत्राव्दारे केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार व कोरोनाचा सामना करण्यासाठी लढा देत असलेल्या राज्यातील लाखो कोरोना योद्ध्यांच्या कार्याला मनापासून पाठिंबा असल्याचे असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

 

औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू होऊ नयेत यासाठी त्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित केलेले असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अश्या प्लांट मधून काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते याचा साधकबाधक अभ्यास करून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे मार्गदर्शनाखाली महानिर्मितीची संपूर्ण यंत्रणा गतिमानतेने कामाला लागली

 

या मिशनच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महानिर्मितीच्या नवीन परळी वीज केंद्राने अवघ्या काही दिवसांत तातडीने युद्ध पातळीवर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात प्रतिदिन २८८ जम्बो सिलिंडर क्षमतेचा व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला. त्यानंतर प्रति तास ८४ घनमीटर क्षमतेचा अशाच प्रकारचा प्लांट परभणी जिल्हा परिषद कोरोना रुग्णालय येथे देखील उभारण्यात आला आहे.

 

पहिला टप्पा तातडीने मार्गी लावल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात आता खापरखेडा व पारस वीज केंद्रातील सध्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांट नजीकच्या शासकीय रुग्णालय परिसरात स्थलांतरित करून तिथून ऑक्सिजन निर्मिती साध्य केली जाणार आहे. खापरखेडा वीज केंद्राद्वारे प्रति तास ४२ घनमीटर या क्षमतेने आणि पारस वीज केंद्राद्वारे प्रति तास ५० घनमीटर या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा साध्य केला जाणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात कोराडी(नागपूर), पारस(अकोला) व परळी (बीड) येथे वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग/बॉटलींग प्लांट उभारण्यात येणार आहे.

 

यासाठी आवश्यक ते कॉम्प्रेसर्स, फिल्टर्स व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री तातडीने विदेशातून आयात/देशांतर्गत उपलब्ध करवून हा तिसरा टप्पा पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.

 

 


Tags: CongressEnergy Minister Dr. Nitin Rautmission oxygenSonia Gandhiमिशन ऑक्सिजन
Previous Post

“भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, बोलत नाही करुन दाखवतो” -प्रविण दरेकर

Next Post

“भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर दबाव होता परंतु आता आपल्याच नेत्यांवर दबाव टाकावा लागतोय” – नवाब मलिक

Next Post
nawab malik

"भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर दबाव होता परंतु आता आपल्याच नेत्यांवर दबाव टाकावा लागतोय" - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!