Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कामांचे नियोजन करतांना भूमिपुत्रांचा विचार करावा”: जयंत पाटील

October 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
jayant patil

मुक्तपीठ टीम

जिल्ह्यात सुरू असणाऱ्या प्रवाही वळण योजनांच्या कामांना गती देण्यात येवून सिंचनाची सर्व कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे कामांचे नियोजन करतांना तेथील भूमिपुत्रांचा विचार करून त्यांना पाणी उपलब्धतेच्या दृष्टिने आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, ॲड माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक कि.भा. कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रमोद मांदाडे, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक आर. आर. शहा, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, अरूण नाईक, महेंद्र आमले यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, नांदुर मधमेश्वर प्रकल्पात असणाऱ्या पक्षी अभयारण्याच्या अनुषंगाने बीओटी (बांधा, वापरा व हस्तांरीत करा) या तत्वावर तसेच पर्यटन विभागाच्या सहाय्याने पर्यटन केंद्र विकसित करण्याचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे शेतीसाठी धरणातील गाळ अत्यंत पोषक असल्याने प्रकल्पांमधील गाळ काढण्याची प्रक्रीया राबविण्यात यावी. तसेच सिंचनाच्या प्रभावी उपाययोजनेसाठी पालखेड कालवा नुतनीकरणाच्या कामाकरीता ३८ कोटी तसेच गोदावरी उजवा व डावा कालव्यांच्या बांधकामाला १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यासाठी ८४ कोटी तर मालेगाव बोरी अंबेदरी, दहीकुटे या लघुपाटबंधारे अंतर्गत बंद पाईपमध्ये रुपांतराच्या कामाला २५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 

दिंडोरी तालुक्यातील देवसाने मांजरपाडा प्रवाही वळण योजनेची घळभरणी पूर्ण करुन ६०६ दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची क्षमता चालू हंगामामध्ये निर्माण करण्यात आली आहे. यातूनच आजपर्यंत साधारण ५०० दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आले आहे. तसेच उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतील दरसवाडी पुर चारीच्या वरील रेल्वे क्रॉसिंगमुळे प्रलंबित असलेले काम जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी कौशल्यरित्या करून दरसवाडी कालवा पुर्ण करण्यात आला आहे. या कामाचे कौतुकही जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी केले.

 

नार-पार महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा: पालकमंत्री छगन भुजबळ

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गुजरात व समुद्राकडे जाणारे पाणी आपल्या राज्यात वळविण्याच्या अनुषंगाने नार-पार हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची तहान भागून मराठवाड्याला देखील पाणी वळविणे शक्य होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी, गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक या नदीजोड प्रकल्पांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात यावा. जेणेकरून हे प्रकल्पांचे काम सुरू करणे शक्य होईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

 

बैठकी दरम्यान उपस्थित आमदार यांनी आपल्या मतदार संघातील विविध योजना व प्रकल्पांच्या बाबत येणाऱ्या अडचणी दूर करून सुरू असलेले संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. याबैठकीत जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या सिंचननामा यापुस्तिकेचे प्रकाशन जलसंपदा मंत्री पाटील व पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

बैठकीच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ती जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


Tags: chhagan bhujbaljayant patilnashikछगन भुजबळजंयत पाटीलभूमिपुत्र
Previous Post

“स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार पंधराशे कोटींची कामे”: छगन भुजबळ

Next Post

विधानसभेत भरणार आमदारांसाठी शाळा…शिकणार ‘अ’ अर्थसंकल्पाचा!

Next Post
vidhan bhavan

विधानसभेत भरणार आमदारांसाठी शाळा...शिकणार 'अ' अर्थसंकल्पाचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!